IMPIMP

Pune Police | पुणे पोलीस दलात ‘कोल्ड वॉर?, महिला IPS अधिकाऱ्यानेच केला ‘वसुली’चा आरोप

by nagesh
Pune Crime | Pune criminals Ganesh Chaudhary and Ajay Vishwakarma are deported from Pune district for two years

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पुणे पोलीस (Pune Police) दलात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप (Audio clip) प्रचंड व्हायरल झाली. यानंतर आयपीएस (IPS) महिला अधिकारी पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (Deputy Commissioner of Police Priyanka Naranware) यांनी ही ऑडिओ क्लिफ मार्फ असल्याचे सांगत पुणे पोलीस (Pune Police) दलातील अधिकारी-कर्मचारी हप्ते घेत असल्याचा गौप्यस्फोट केला. यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून यावरून आता कोल्ड वॉर (Cold War) सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियंका नारनवरे (deputy commissioner of police priyanka naranavre) यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा माध्यमांकडे करताना गौप्यस्फोट केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काही कर्मचारी 10-10 वर्षे झाले ते हप्ता वसुली करायचे. त्यांची बदली (Transfer) करण्यात आली. तरी
देखील ते तेथून हप्ता वसूल करीत होते. मी आल्यापासून येथील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध दुखावले आहेत.
पूर्वी असलेल्या डीसीपी (DCP) यांचे हितसंबंध असल्यानेच हा प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप पोलिस
उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी केला. नारनवरे यांच्या खुलाशानंतर पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ
अधिकाऱ्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सध्या पुणे पोलिस दलात उच्च पदस्थ
अधिकार्‍यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासुन पोलिस दलात सुरू आहे. मात्र ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तसेच त्याबाबतच्या खुलाशानंतर कोल्ड वॉर सुरू असल्याचं अगदी स्पष्ट झालं आहे.

Web Title : pune police cold war in senior police officers in pune police

हे देखील वाचा :

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

PMRDA | पीएमआरडीएकडून विकासकामांसाठी 817.5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

Related Posts