IMPIMP

Pune Police Combing Operation | गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 13 कोयते, 2 तलवार जप्त

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन गणपती विसर्जनाच्या (ganpati visarjan) पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) राबवण्यात आले. कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) दरम्यान सराईत गुन्हेगारांची तपासणी करुन प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action) करण्यात आली. तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या 15 जणांवर गुन्हे दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली असून 13 कोयते, 2 तलवार, 1 पालघन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी (दि.17) रात्री नऊ ते शनिवारी (दि.18) पहाटे 2 च्या दरम्यान केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी परिमंडळचे पोलीस उपायुक्त व गुन्हे शाखेचे उपायुक्त यांना गुन्हेगार चेक करुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी कोंबिंग ऑपरेशन केले. तसेच पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेने (Crime Branch) अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील (Pune City) वेगवेगळ्या परिसरात शनिवारी रात्री धडक कारवाई केली.

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकूण 1668 गुन्हेगार चेक केले. त्यापैकी 424 गुन्हेगार मिळून आले आहेत. प्रतिबंधक कारवाईत एकूण 146 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 525 हॉटेल, लॉज तपासण्यात आले.

आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत (Arm Act) 15 केसेस करुन 15 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 13 कोयते, 2 तलवार, 1 पालघन असा एकूण 5 हजार 450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा 2 व पोलीस स्टेशनने 5 अशा एकूण 7 तडीपार आरोपींना ताब्यात घेतले.
युनिट 2 च्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करुन 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

युनिट 6 च्या पथकाने दरोड्याच्या तयारी असलेल्या 3 आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून 1 स्विफ्ट डिझायर कार, धारदार शस्त्र असा एकूण 3 लाख 97 हजार 036 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी सोहेल जवेद शेख याला अटक केली आहे.
तसेच खंडणी विरोधी पथक दोनने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मेहराज अन्वर शेख याला अटक करुन फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि 2 यांनी 6 केसमध्ये 6 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 24 हजार 070 रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
वाहतुक शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 227 रिक्षा, 30 इतर वाहने व 6 ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस अशा एकूण 263 जणावर कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta)
यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
पश्चिम प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कारभार) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), परिमंडळ -1 चे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (DCP Priyanka

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Naranware), परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Pankaj Deshmukh),
परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Police Combing Operation | Pune police’s ‘combing operation’ on the backdrop of Ganpati immersion! 13 coyotes, 2 swords seized

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | 7.13 रुपयांचा स्टॉक झाला 718 रुपयांचा, 1 लाखाचे झाले 10 कोटी, तुमच्याकडे आहे का?

Ration Card | खुशखबर ! आता रेशन कार्डसंबंधीत ‘या’ मोठ्या सेवा मिळताहेत ऑनलाइन, जाणून घ्या काय करावे लागेल?

BJP vs Shivsena | ‘सामना’तून अमित शहांसह भाजप नेत्यांवर टीकेचे बाण ! … तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीत ‘पराभूत’

Related Posts