IMPIMP

Ratnagiri Flood | पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले ? अनिल परब यांनी केला खुलासा, म्हणाले…

by nagesh
Anil Parab | anil parab office in mhada colony demolished thakceray camp get aggressive against mhada and kirit somaiya

रत्नागिरी (Ratnagiri): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Ratnagiri Flood | अतिवृष्टीमुळे राज्यातील काही जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा नागरिकांना मदतीची घोषणा केलीय. दरम्यान रत्नागिरीतील (Ratnagiri Flood) खेड तालुक्यातल्या पोसरे (Posare) गावात पूरग्रस्तांना (Flooded) दिलेले शासकीय मदतीचे धनादेश परत घेण्यात आल्याचं समोर आलं होतं. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. च्या पार्श्वभिमीवर मात्र अनिल परब यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या विषयावरून टीका होऊ लागल्यानंतर धनादेश (cheque) परत घेण्यात आल्याची बातमी खरी
असल्याचं स्वतः अनिल परब यांनी सांगितलं आहे. मात्र, दिलेले धनादेश (cheque) परत घेण्याचं कारण
वेगळं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील (Collector b.
N. Patil) यांनी देखील याला दुजोरा दिला असून माध्यमातून प्रसारित केली जाणारी बातमी सत्य परिस्थितीला धरून नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

अनिल परब (Anil Parab) हे माध्यमांना सांगताना म्हणाले की, ‘मी स्वत: जाऊन पोसरे गावात सरकारच्या
मदतीचे चेक देऊन आलो होतो. मात्र, गावातील काही प्रतिनिधींनी विनंती केली होती की चेक दिलेली बँक
तीस किलोमीटर लांब आहे. म्हणून तिथे जाण्याची आमची अडचण आहे. यावरून आपण शासनाचा
प्रतिनिधी आमच्यासोबत द्यावा. त्यांचे खाते नंबर शोधायचे होते. चिपळूणच्या सर्व बँका पुराच्या पाण्याखाली
गेल्या होत्या. म्हणून, सरकारच्या प्रतिनिधीने ते धनादेश (cheque) परत घेतले होते. ते वटवण्याचं काम
दुसऱ्या बँकेतून अथवा त्याच बँकांमधून केलं गेलं. शासनाच्या प्रतिनिधीने स्वत: जाऊन सर्वांचे पैसे त्यांच्या
खात्यात जमा केलेत. असं स्पष्ट करत परब (Anil Parab) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या विषयावरून रत्नागिरी स्थानिक जिल्हा प्रशासनाने सुद्धा माहिती दिली आहे की, ‘चेक वाटपाबाबत चुकीची बातमी पसरली होती.
खेडमधल्या पोसरेमधील 4 मृत्यूच्या वारसांना चेकचं वाटप केलं होतं.
परंतु, दुर्घटनाग्रस्त लोकांची घरं गाडली गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक अथवा त्याचा तपशील
वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यांची बँक तीस किमी लांब असल्यामुळे त्यांचे चेक घेऊन पैसे थेट बँकेत जमा केले आहेत.
लाभार्थ्यांच्या विनंतीनुसार मदत करण्यासाठी संबंधित तलाठ्यांनी धनादेश (cheque) परत घेतले होते. आता सर्व धनादेश (cheque) बँकेत जमा झालेत.
अशी माहिती जिल्हाधिकारी बी. एन. पाटील (Collector b. N. Patil) यांनी दिली आहे.

Web Title : ratnagiri flood anil parab clarifies on ratnagiri posare case flood affected people cheques taken back by government

हे देखील वाचा :

Library Wall | पोलंडहून आली अद्भूत छायाचित्रे, विद्यापीठाच्या भिंतीवर लिहिलेत उपनिषदातील श्लोक; भारतीय दूतावासाने केले ‘ट्विट’

IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेत 920 जागांसाठी बंपर भरती

Pune News | ‘त्या’ वक्तव्यावरून गणेश बिडकर यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

Gold Price Today | सोने पुन्हा झाले 47 हजारी, चांदी 766 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन दर

Related Posts