IMPIMP

Sanjay Raut | रामदास कदम यांना शिवसेनेनं उमेदवारी का नाकारली? खासदार संजय राऊत म्हणाले….

by nagesh
Sanjay Raut | ramdas kadam will continue to work as shiv sena leader says mp sanjay raut marathi news

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी शिवसेनेने (Shivsena) मुंबईतून माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे नेते आणि विद्यमान आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. तसेच कदम यांना उमेदवारी का नाकारली याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुनिल शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघात (Worli Assembly constituency) आमदार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासाठी त्यांनी आपला मतदारसंघ सोडला होता. त्यांचा हा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे यांच्या त्यागाची आणि निष्ठेची आठवण ठेवून त्यांना उमेदवारी दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

रामदास कदम कडवट शिवसैनिक
शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात रामदास कदम यांनी भाजपच्या (BJP) नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोप आहे.
याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील मध्यंतरी व्हायरल झाली होती. त्यामुळेच त्यांना उमेदवारी नाकारली अशी चर्चा आहे.
यावर त्यांना विचारले असता त्यांनी थेट काही बोलण्यास नकार दिला.
मात्र, रामदास कदम हे देखील कडवट शिवसैनिक असून पक्षाचे नेते आहेत.
ते आमदार होते, मंत्री होते, विधान परिषदेतही होते. ते माझी सहकारी आहेत.
आम्ही एकत्र काम करत राहू असेही राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

Web Title :- Sanjay Raut | ramdas kadam will continue to work as shiv sena leader says mp sanjay raut marathi news

Nashik News | राजकारणातील वैरी एकत्र आले अन् गळ्यात गळे घालून भेटले, राऊत-फडणवीस-दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण

Mumbai Session Court | होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा नाही, मुंबई सत्र न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी

ST Workers Strike | ST संपाचा आणखी एक बळी? संपकरी बसचालकाची आत्महत्या

Related Posts