IMPIMP

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’; ‘या’ पध्दतीनं टाळा

by nagesh
sbi customer needs to pay penalty for every atm transaction due to insufficient balance know how to avoid

नवी दिल्ली : वृत्त संस्थाSBI | जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. ATM मधून पैसे काढण्यापूर्वी हे आवश्य तपासा की तुमच्या खात्यात किती पैसे आहेत, कारण चुकून जरी शिल्लकपेक्षा जास्त पैसे काढण्याच्या प्रयत्न केला तर तुमचे ट्रांजक्शन फेल होईल आणि बँक तुमच्याकडून पेनल्टी वसूल करेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स पडणार महागात !

एसबीआयच्या वेबसाइटनुसार सध्या अकाऊंटमध्ये आवश्यक बॅलन्स नसताना पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येक फेल ट्रांजक्शनवर 20 रुपयांचा दंड द्यावा लागेल, ज्यावर GST वेगळा लागेल.

असे ठेवा बॅलन्सवर लक्ष

हा नियम नवीन नसला तरी तुम्ही तो लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून विनाकारण पेनल्टी भरण्यापासून वाचता येईल. आपल्या सेव्हिंग अकाऊंट बॅलन्सवर लक्ष ठेवणे सोपे आहे. जसे की एसएमएसद्वारे, एटीएमद्वारे, मिस्ड कॉलद्वारे शिल्लक तपासू शकता. याशिवाय Online SBI तसेच, गुगल पे किंवा फोन पे वर सुद्धा बॅलन्स चेक करू शकता.

मागील वषी आला होता हा नवीन नियम

एसबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये एक नियम आणला होता. त्यानुसार एसबीआय एटीएममधून 10 हजार
किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर केवळ पिन टाकणे पुरेसे नाही.
तुम्हाला बँकेत रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेल्या वन टाइम पासवर्ड (OTP) सुद्धा एटीएममध्ये नोंदवावा लागेल, तरच पैसे काढू शकता.

Web Title :  sbi customer needs to pay penalty for every atm transaction due to insufficient balance know how to avoid

Related Posts