IMPIMP

ST Workers Strike | ST संपाचा आणखी एक बळी? संपकरी बसचालकाची आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरु असलेल्या संपाने (ST Workers Strike) कर्मचारी आर्थिक संकटात (financial difficulties) तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झाला आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील (Peth Depot) चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (ST Bus Driver Commits Suicide) केली. ही घटना आज (शनिवार) सकाळी घडली. या घटनेमुळे पेठ आगारातील कर्मचारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our
Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

पेठ आगारात चालक पदावर गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असणारे गहनीनाथ अंबादास गायकवाड Gahaninath Ambadas Gaikwad (वय-33 रा. मामावली, ता. आष्टी, जि. बीड हल्ली मुक्काम सुलभानगर, पेठ) हे संप सुरु झाल्यापासून सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात (ST Workers Strike) सहभागी झाले होते. दरम्यान, घरी गॅस संपल्याचे समजल्याने ते घरी गेले. आर्थिक ओढाताणीने विमनस्क स्थितीतच आपल्या खोलीचे दार बंद करुन गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी त्यांची पत्नी व मुले बाहेरील खोलीत होते.

बराच वेळ झाला तरी पती दरवाजा उघडत नसल्याने पत्नीला संशय आला.
पत्नीने दरवाजा ठोठावूनही आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला.
त्यावेळी गहिनीनाथ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
त्यांना खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
पेठ पोलीस ठाण्यात (Peth police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- ST Workers Strike | nashik district peth bus driver commits suicide due to financial difficulties

Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले – ‘आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला’

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला
पावसाचा इशारा

Aurangabad Crime | मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेनं केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू; प्रचंड खळबळ

Related Posts