IMPIMP

Tata Safari Gold | ‘टाटा सफारी’ची गोल्ड एडिशन झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

by nagesh
Tata Safari Gold | tata safari gold edition launched know features and price

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Tata Safari Gold | टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय एसयूव्ही टाटा सफारीची नेक्स्ट जेन एडिशन लाँच केली आहे. टाटा मोटर्सने ही प्रीमियम एसयूव्ही टाटा सफारी गोल्ड (Tata Safari Gold) दोन कलर ऑपशनमध्ये लाँच केली आहे, जो व्हाईट आणि ब्लॅक गोल्ड आहे. कंपनी या नव्या एसयूव्हीचे सार्वजनिक प्रदर्शन आयपीएलदरम्यान दुबईत करेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या नव्या एसयूव्हीमध्ये शानदार गोल्ड एक्सटेरियर आणि इंटेरियर दिले आहे.
याशिवाय एसयूव्हीमध्ये कंपनीने R18 चारकोल ब्लॅक अलॉय व्हील दिले आहेत.
या एसयूव्हीच्या फीचर्सबाबत जाणून घेवूयात…

शानदार डिझाईन

कंपनीने एसयूव्हीच्या व्हाईट गोल्ड व्हेरिएंटला फ्रॉस्ट व्हाईट कलरने मॅच केले आहे.
याशिवाय एसयूव्हीचा रूफ ब्लॅक ठेवला आहे.
ज्यामुळे ड्युअल टोन दर्शवते. एसयूव्हीच्या इंटेरियरमध्ये मोंट ब्लॅक मार्बल फिनिश पॅड तिचा लुक आणखी सुंदर बनवतो.

ब्लॅक गोल्ड एडिशनचा कलर कॉफी बीनपासून इन्स्पायर्ड आहे, याशिवाय रेडियंट गोल्ड एक्सेंट तिच्या एक्सटेरियरला आणखी आकर्षक बनवतो.
या व्हेरिएंटच्या इंटेरियरमध्ये डार्क मार्बल फिनिश मिड पॅड आणि गोल्डन टच दिला आहे.

फीचर्स

या एसयूव्हीच्या इंटेरियरमध्ये शानदार फीचर्स जसे की ओएस्टर व्हाईट डायमंड क्विल्ट लेदर सीट, वायरलेस चार्जर, एयर प्यूरीफायर, फर्स्ट आणि सेकंड रोमध्ये सुद्धा व्हेंटिलायजेशन असे फीचर्स दिले आहेत.
याशिवाय अँड्राईड ऑटो आणि अ‍ॅप्पल कारप्ले वायफायसोबत दिला आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स

ही फ्लॅगशिप हॅर्रिएर बेस्ड एसयूव्ही 6 आणि 7 सीटरआहे आणि तिला OMEGARC आर्किटेक्चर आहे. एसयूव्हीमध्ये 2.0-लीटरचे डिझेल इंजिन आहे आणि यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक दोन्ही गियरबॉक्सचे ऑपशन आहे. हे इंजिन 170 PS ची पावर आणि 350 Nm चा टार्क निर्माण करते.

एसयूव्हीच्या लाँचवर बोलताना टाटा मोटर्सचे मार्केटिंग, पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल बिझनेसचे युनिट हेड विवेक श्रीवत्स यांनी म्हटले की, आम्ही फ्लॅगशिप एसयूव्ही सफारीच्या लाँचच्या 5 महिन्यानंतर आम्ही 10 हजार यूनिट्स सेलचा आकडा गाठला आणि आमची ही एसयूव्ही आपल्या सेगमेंटमध्ये टॉप सेलरमध्ये आहे.

विवेक श्रीवत्स यांनी म्हटले की, आम्ही आमच्या कस्टमर्सचे प्रेम लक्षात घेऊन आमच्या नवीन प्रेस्टीजियस एसयूव्ही टाटा सफारी गोल्ड एडिशनच्या लाँचची घोषणा करीत आहोत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

किंमत

कंपनीने आपल्या या फ्लॅगशिप एसयूव्हीची किंमत 21.89 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली आहे.

Web Title : Tata Safari Gold | tata safari gold edition launched know features and price

हे देखील वाचा :

Social Media Market | सन 2025 पर्यंत सोशल मीडियाचं मार्केट 2200 कोटी रुपये होण्याची अपेक्षा – रिपोर्टमध्ये दावा

MLA Rohit Pawar | नगरमध्ये आ. रोहित पवारांचा भाजपला दुसरा धक्का; ‘हा’ बडा कार्यकर्ता राष्ट्रवादीत

Sanjay Raut | संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात

Related Posts