IMPIMP

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

by nagesh
it company cognizant will hire more than 1 lakh employee company income increased by 418 percent

नवी दिल्ली : वृत्तसंस्था: IT Company | जर तुम्ही सुद्धा नोकरी (Job) च्या शोधात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. दिग्गज आयटी कंपनी (IT Company) कॉग्निजेंट (cognizant) यावर्षी एक लाख लोकांना नोकरी (Job for 1 lakh persons) देईल. जून तिमाहीत कंपनीचे एकुण उत्पन्न 41.8 टक्के वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर (जवळपास 3,801.7 कोटी रुपये) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली. अमेरिकेतील या कंपनीला जून 2020 तिमाहीत 36.1 कोटी डॉलरचे एकुण उत्पन्न मिळाले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कॉग्निजेंट (cognizant) ने आर्थिक वर्ष 2021 साठी उत्पन्न वाढीचे लक्ष्य वाढवून 10.2-11.2 टक्के केले आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 14.6 टक्के वाढून 4.6 अरब अमेरिकन डॉलर झाला आहे, जो एक वर्षापूर्वी याच कालावधीत चार अरब अमेरिकन डॉलर होता. हा आकडा कंपनीच्या पूर्वअंदाजापेक्षा जास्त आहे.

कंपनीच्या सीईओंनी दिली माहिती

कॉग्निजेंटचे CEO ब्रायन हम्फ्रीज (Brian Humphries) यांच्यानुसार, आम्हाला आशा आहे की
आम्ही 2021 मध्ये जवळपास 1 लाख भरती (Recruitment) करू आणि जवळपास 1 लाख
असोसिएट्सला ट्रेन करू. याशिवाय, कॉग्निजेंटला 2021 मध्ये जवळपास 30,000 नवीन
पदवीधारकांचा समावेश करणे आणि 2022 साठी भारतात नवीन पदवीधारकांना 45,000 प्रस्ताव
देण्याची आशा आहे.

Web Title : it company cognizant will hire more than 1 lakh employee company income increased by 418 percent

हे देखील वाचा :

Pune Crime | रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणार्‍यास सक्तमजुरीची शिक्षा; चोरीच्या 11 गुन्ह्यात झाला कारावास

WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारताचे स्वत:चे Sandes अ‍ॅप, जाणून घ्या कसे करते काम

Rajesh Tope | राज्यातील ‘हे’ 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यातील निर्बंध उठणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Related Posts