IMPIMP

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत गुंतवा एकदाच पैसे आणि मिळवा दरमहा 12 हजार रुपये; जाणून घ्या ‘हे’ 6 फायदे

by nagesh
LIC Saral Pension Plan | lic saral pension plan get 12000 rs per month pension check how

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअलीकडच्या काळामध्ये गुंतवणुकीचे (Investment) प्रमाण वाढले आहे. विविध योजनांमध्ये अनिक व्यक्ती गुंतवणूक करत असतात. भविष्यासाठी गुंतवणुकीचा (Investment Planning) जर कोणी विचार करत असेल तर त्यांच्यासाठी एलआयसीकडून (LIC) काही चांगल्या योजना (scheme) सांगितल्या जात आहेत. जर कोणी पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल तर एलआयसीची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Plan) चांगलीच उपयोगी ठरू शकते. या सरल पेन्शन योजनेत (LIC Saral Pension Plan) एकदाच प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 12 हजार रुपये मिळतील. जाणून घ्या काय आहे ही योजना आणि तिचे फायदे…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

योजनेचे दोन प्रकार


एलआयसीची सरल पेन्शन योजनेचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकारात लाइफ अँन्युइटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइस (Life Annuity with 100 percent return of purchase price) ही योजना सिंगल लाइफसाठी (single life) आहे. म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला असले. त्याला पेन्शन मिळेल. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम (Nominee base premium) मिळेल.

दुसरा प्रकार म्हणजे पेन्शन योजना जॉइंट लाइफ (Pension scheme joint life) यामध्ये पती-पत्नी दोघांना पेन्शन मिळेल. दोघांमधील जी व्यक्ती दीर्घकाळ हयात राहते तिला पेन्शन मिळते. जेव्हा दोघांचाही मृत्यू होतो तेव्हा नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

सरल पेन्शन योजनेच्या खास बाबी

जर कोणी या योजनेत पैसे गुंतवले तर त्या विमाधारकाला लगेच पेन्शन सुरू होते.
ही पेन्शन मासिक, तिमाही आणि सहामाही मिळते त्यामुळे पॉलिसी घेणाऱ्यावर त्याला पेन्शन कशी हवी हे अवलंबून आहे.
ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (offline) दोन्ही पद्धतीने तुम्ही ही योजना खरेदी करू शकता.
या योजनेत वार्षिक कमीतकमी 12 हजार रुपये गुंतवावे लागतील, अधिकाधिक गुंतवणुकीची मर्यादा नाही.
वयोमर्यादा 40 ते 80 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी आहे.
महत्वाचे म्हणजे ही पॉलिसी सुरू करण्याच्या तारखेच्या सहा महिन्यानंतर पॉलिसी होल्डर कधीही यावर कर्ज घेऊ शकतो.

Web Title :- LIC Saral Pension Plan | lic saral pension plan get 12000 rs per month pension check how

हे देखील वाचा :

Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Corporation | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील ‘गोदाम’ मालकांची झाली अडचण; व्यावसायीक दराने मिळकतकर आकारणी मुळे आर्थिक ‘भार’ वाढला

Related Posts