IMPIMP

लग्नानंतर बदलले असेल नाव तर Aadhar Card मध्ये कसे करावे अपडेट, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
Aadhaar Seva Kendra Location | aadhaar seva kendra location will be updated on portal uidai deals with isro see here details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhar Card चा वापर आजच्या काळात सरकारी योजनांच्या लाभापासून ते आयटीआर फाइलिंग आणि बँकांसारख्या ठिकाणी केला जातो. भारतात कोणत्याही कामात आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. म्हणजेच आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. यासाठी वेळोवेळी अपडेट करणे देखील आवश्यक आहे, कारण अपडेट न केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. (Aadhar Card)

UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर, आधार कार्डमध्ये सुधारणा, अपडेट आणि इतर माहिती नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. वापरकर्ते UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन नाव, पत्ता, फोन नंबर आणि ई-मेल आयडी यासारखे तपशील बदलू शकतात.

दुसरीकडे, जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तुम्हाला तुमचे नाव तुमच्या आधारमध्ये अपडेट करायचे असेल, तर तुम्ही ते ऑनलाइन बदलू शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.

हे काम घरात बसून करता येते. किंवा तुमच्या नावात काही चूक असेल तर तुम्ही ती बदलू शकता. तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव कसे बदलू शकता याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात…

सर्वप्रथम, आधारची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

त्यानंतर My Aadhar विभागात ’Update Demographics Data Online’ वर जा.

आता अघडलेल्या नवीन टॅबमध्ये ’Proceed to Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.

आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर OTP येईल.

नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी नोंदवल्यावर, ’Update Demographics Data’ वर क्लिक करा.

आता काय बदलायचे आहे ते निवडा.

यासोबतच कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. उदाहरणार्थ, तुम्हाला पॅन, पासपोर्ट इत्यादी ओळखीच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत सबमिट करणे आवश्यक आहे.

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आणि योग्य तपशील नोंदवल्यानंतर, पेमेंट करण्यासाठी पुनर्निर्देशित केले जाईल.

पेमेंट पूर्ण झाल्यावर, एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) तयार होईल. तुम्ही पोचपावती कॉपी देखील डाउनलोड करू शकता. (Aadhar Card)

नाव ऑफलाइन देखील बदलता येते

जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.

सहाय्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती केंद्रावर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.

ऑफलाइन नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

लग्नानंतर आधार कार्डमध्ये नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी, अधिकृत सरकारी विभागाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्रासारखी आधारभूत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्रात पती आणि पत्नी दोघांचा पत्ता असावा.

Web Title :- Aadhaar Card | if name changed after marriage then how to update in aadhar card know step by step process

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts