IMPIMP

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक ! पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR

by nagesh
Assam Mizoram Border Conflict | cachar sp vaibhav nimbalkar injured in assam mizoram border clash recovering fast

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आसाम-मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात (Assam Mizoram Border Conflict) आसाम पोलीस दलाचे 6 जवान मृत्यूमुखी पडले होते. तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आसाम-मिझोराम सीमेवर झालेल्या हिसाचार (Assam-Mizoram Border Conflict) प्रकरणी मिझोरामने चक्क आसामाच्या मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. यामध्ये काचारचे पोलीस अधिक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर (Kachar Superintendent of Police Vaibhav Chandrakant Nimbalkar) यांचा समावेश आहे. निंबाळकर हे पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूरचे (Indapur) रहिवासी आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हिंसाचार प्रकरणात आसाम पोलिसांनी मिझोराममधील राज्यसभा खासदार के. वानलालवेना (Mizoram Rajya Sabha MP K. Vanlalvena) यांच्या विरोधात कारवाई करण्याची पावले उचलली आहेत. यानंतर मिझोरामने या प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा (Assam CM Himanta Biswa Sarma) आणि आसामच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मिझोराममधील कोलसिब जिल्ह्यातील वैंरग्टे पोलीस ठाण्यात (Vairengte Police Station) दाखल करण्यात आला आहे.

200 पोलिसांवर गुन्हा दाखल

मिझोराम पोलिसांनी सांगितले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या आदेशावरुन आसाम पोलिसांनी मिझोराम पोलिसांसोबत शांततेत चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी कोलसिबचे पोलीस अधीक्षकांना सांगितले की मिझोरामचा भूभाग आसामच्या मालकीचा आहे. त्याठिकाणी ते कॅम्प उभारणीचे नियोजन करत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांसह आसामचे 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 2 प्रशासकीय अधिकारी यांच्यासह 200 पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.

या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

आसामचे पोलीस महानिरीक्षक अनुराग अग्रवाल (Assam Inspector General of Police Anurag Agarwal), उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी (Deputy Inspector General Devajyoti Mukherjee), काचारचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर आणि धौलाई पोलीस ठाण्याचे
प्रभारी साहब उद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच कचर उपायुक्त कीर्ती जल्ली आणि विभागीय वन अधिकारी सनीदेव चौधवरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंबाळकर यांच्यावर मुंबईत उपचार

आसाम-मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात पोलीस अधिक्षक निंबाळकर हे जखमी झाले आहेत.
त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आता त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्ह्यात मिझोराम पोलिसांनी आरोपी केले आहे.

Web Title : Assam Mizoram Border Conflict | cachar sp vaibhav nimbalkar injured in assam mizoram border clash recovering fast

हे देखील वाचा :

Modi government | PM मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला; म्हणाले – ‘मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी भरु नका’

Pune News | डीएसके प्रकरणाची एमपीआयडी न्यायालयातच सुनावणी व्हावी; बचाव पक्षाचा युक्तिवाद

Aadhaar Card Document | आधार कार्ड हरवलंय? मग, ‘हे’ करा महत्वाचं काम, जाणून घ्या

Related Posts