IMPIMP

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

by nagesh
coronavirus in india | india coronavirus cases 28 july 2021 covid today news update cases deaths second wave

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : Coronavirus in India | देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढली आहेत. 5 दिवसानंतर 40 हजारपेक्षा जास्त नवीन केस (Coronavirus in India) नोंदल्या गेल्या आहेत. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात 43,654 नवीन कोरोना केस आल्या आणि 640 संक्रमितांना जीव (Coronavirus in India) गमवावा लागला. तर मागील 24 तासात 41,678 लोक कोरोनातून बरे झाले. काल 1336 अ‍ॅक्टिव्ह केस वाढल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोना संसर्गाची एकुण प्रकरणे

महामारीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 84 हजार लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 4 लाख 22 हजार 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब ही आहे की, 3 कोटी 6 लाख 63 हजार लोक बरे सुद्धा झाले आहेत. देशात कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 4 लाखाने कमी झाली आहे. एकुण 3 लाख 99 हजार लोक आजही कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

44 कोटीपेक्षा जास्त व्हॅक्सीन डोस दिले

आरोग्य मंत्रालयानुसार, 27 जुलैपर्यंत देशभरात 44 कोटी 61 लाख कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. काल 40 लाख 2 हजार डोस दिले गेले. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) नुसार, आतापर्यंत 46 कोटी 9 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल 17.36 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले, ज्यांचा पॉझिटिव्ह रेट 3 टक्केपेक्षा कमी आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.34 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्केपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह केस 1.27 टक्के आहे. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केस प्रकरणात जगात भारत 7 व्या स्थानावर आहे. एकुण संक्रमितांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसर्‍या नंबरवर आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.

काही राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती

– महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाची 6258 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची एकुण संख्या वाढून 62,76,057 पर्यंत पोहचली. 254 रूग्णांच्या मृत्यूसह मृतांची एकुण संख्या वाढून 1,31,859 झाली.

– केरळात कोविडची 22,129 नवीन प्रकरणे समोर आली, ज्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 33,05,245 झाली. 156 रूग्णांच्या मृत्यूनंतर एकुण मृतांची संख्या वाढून 16,326 झाली.

– छत्तीसगढमध्ये मागील 24 तासादरम्यान 128 नवीन लोकांना कोरोना संसर्ग झाला. यासोबतच
राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या लोकांची संख्या वाढून 10,01,487 झाली आहे.

– मध्य प्रदेशात 11 नवीन प्रकरणे समोर आली आणि यासोबत प्रदेशात या व्हायरसने आतापर्यंत
संक्रमित आढळलेल्या लोकांची एकुण संख्या 7,91,767 पर्यंत पोहचली. मरणार्‍यांची संख्या 10,512 आहे.

– आंध्र प्रदेशात 1540 नवीन प्रकरणे आली आहेत ज्यामुळे संक्रमितांची संख्या वाढून 19,57,932 झाली आहे.

– राजस्थानमध्ये 15 नवीन प्रकरणे समोर आली. तर एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 8,953
लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 278 संक्रमित उपचाराधीन आहेत.

Web Title : coronavirus in india | india coronavirus cases 28 july 2021 covid today news update cases deaths second wave

हे देखील वाचा :

Coronavirus in India | देशात गेल्या 24 तासात 43 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण, 3 आठवड्यातील सर्वाधिक प्रकरणं

Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

Tokyo Olympics 2020 | टोकियो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड

Related Posts