IMPIMP

Coronavirus in India | ऑगस्टमध्ये सातत्याने वाढत आहेत कोरोनाच्या नवीन केस, कालच्या तुलनेत 4 % वाढीसह आली सुमारे 45 हजार प्रकरणे

by nagesh
Coronavirus in India | india coronavirus update 6 august 2021 covid new cases deaths second wave

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Coronavirus in India | भारतात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही थांबलेला नाही. ऑगस्टमध्ये कोरोनाच्या नवीन केस सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यानुसार, मागील 24 तासात 44,643 नवीन कोरोना केस आल्या आणि 464 संक्रमितांचा (Coronavirus in India) मृत्यू झाला आहे. मात्र, देशभरात मागील 24 तासात 41,096 लोक कोरोनातून बरे सुद्धा झाले आहेत म्हणजे काल 3083 अ‍ॅक्टिव्ह केस वाढल्या.

या गुरुवारी देशात 42,982 नवीन प्रकरणे नोंदली गेली होती आणि 533 संक्रमितांचा मृत्यू झाला होता. म्हणजे आज मागील दिवसापेक्षा सुमारे चार टक्के जास्त कोरोना केस आल्या आहेत. ऑगस्टमध्ये कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. केवळ एक दिवस 2 ऑगस्टला प्रकरणांमध्ये घट झाली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

केरळात सर्वात जास्त कोरोना केस

केरळात गुरुवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 22,040 नवीन प्रकरणे समोर आली,
तर संसर्गाने 117 रूग्णांचा मृत्यू झाला.
केरळात एकुण संक्रतितांची संख्या वाढून 34.93 लाख झाली आहे तर मृतांची संख्या 17,328 वर पोहचली आहे.
आतापर्यंत 32,97,834 लोक बरे झाले आहेत आणि आता 1,77,924 रूग्ण उपचाराधीन आहेत.
केरळात संसर्गाचा दर 13.49 टक्के नोंदला गेला आहे.

कोरोना संसर्गाची एकुण प्रकरणे

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकुण तीन कोटी 18 लाख 56 हजार लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 4 लाख 26 हजार 754 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चांगली बाब ही आहे की 3 कोटी 10 लाख 15 हजार लोक बरे सुद्धा झाले आहेत.
देशात कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या अजूनही चार लाखापेक्षा जास्त आहे.
एकुण 4 लाख 14 हजार लोक अजूनही कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत सुमारे 50 कोटी व्हॅक्सीनचे डोस दिले – दावा

आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की, 5 ऑगस्टपर्यंत देशभरात 49 कोटी 53 लाख कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. कालच्या दिवसात 57.97 लाख डोस दिले गेले.
तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर), आतापर्यंत 47 कोटी 65 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.
मागील दिवसात सुमारे 16.40 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले, ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्केपेक्षा कमी आहे.

देशात कोरोनाने मृत्युदर 1.34 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्केपेक्षा जास्त आहे.
अ‍ॅक्टिव्ह केस 1.29 टक्के आहे. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केस प्रकरणात जगात भारत आता आठव्या स्थानावर आहे.
एकुण संक्रमितांच्या संख्येत भारत दुसर्‍या नंबरवर आहे.
तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.

Web Title : Coronavirus in India | india coronavirus update 6 august 2021 covid new cases deaths second wave

हे देखील वाचा :

Tokyo Olympics | बजरंगाची ‘कमाल’ ! किर्गिस्तानच्या अरनाजरवर केली ‘मात’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’

EPFO अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत

Related Posts