IMPIMP

Crime News | बँकेचा कर्जास नकार; पट्ट्याने बँकच दिली पेटवून

by nagesh
Crime News | karnataka loan application is canceled person set the bank on fire accused arrested

हावेरी : वृत्तसंस्था Crime News | बँकेकडून कर्ज घेणे काही सोपी गोष्ट नसते. त्यातच कोरोना सारख्या महामारीमुळे तर कर्ज घेण्याची प्रक्रिया आणखी कठीण होऊन बसली आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यामध्येही (Karnataka, Haveri) अशीच एक घटना (Crime News) समोर आली आहे. बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याच्या कारणातून 33 वर्षीय एका व्यक्तीने चक्क बँकच पेटवून दिली. गेल्या शनिवारी ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी वसीम हजरतसाब मुल्ला (Wasim Hazratsab Mulla) याला ताब्यात (Arrested) घेतले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेडीगोंडा गावातील (Hedigonda) वसीमने कॅनरा बँकेच्या (Canara Bank) शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा सीबील स्कोअर कमी असल्याने बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे वसीम संतापला होता. वसीम पूर्णपणे निराश झाला होता. या नैराश्यात व निराशेमध्ये वसीमने शनिवारी रात्री बँकेत पोहोचला. तेथे खिडकी तोडून बँकेच्या आत प्रवेश केला. यानंतर त्याने पेट्रोल ओतून बॅंक पेटवून दिली. (Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काही वेळात धुराचे लोट पसरू लागल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. स्थानिकांनी तत्काळ पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान आग लावल्यानंतर पळून जाताना नागरिकांनी वसीमला पकडले होते. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कागिनेली पोलिसांनी (Caginelli Police) आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला असून त्याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrested) करण्यात आली आहे.

Web Title :-  Crime News | karnataka loan application is canceled person set the bank on fire accused arrested

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध, गरोदर राहिल्याने गर्भपात; डॉक्टरसह चौघांवर FIR

PM Awas Scheme | ‘पीएम आवास’मध्ये तुम्हाला घर मिळाले नाही का? येथे अशी करा तक्रार, ताबडतोब होईल सुनावणी

Delhi High Court | ‘लग्नानंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य, अविवाहित जोडप्यांना तो अधिकार नाही’ : दिल्ली उच्च न्यायालय

Related Posts