IMPIMP

Delta Variant | डेल्टापेक्षा जास्त धोकादायक व्हेरिएंट सुद्धा येऊ शकतो समोर? जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

by nagesh
Delta Variant | nose infected with delta contains 1260 times more virus than normal covid 19 virus says research read here full detail about sars cov 2 delta variant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. हा व्हायरस (Corona virus) घातक आहे, तसेच सतत आपले स्वरूपसुद्धा बदलत आहे. याचे रूप संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे जगातील मोठ-मोठे शास्त्रज्ञ आता डेल्टा व्हेरिएंटवर (Delta Variant) फोकस करत आहेत आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, व्हायरसचा इतर एखादा व्हेरिएंट डेल्टाची (Delta Variant) जागा घेऊ शकतो का.

Delta Variant :


दुसर्‍या लाटेदरम्यान भारतात सर्वात पहिल्यांदा समोर आलेल्या कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त चिंताजनक झाला आहे. हा अनेक देशांच्या लोकसंख्येला वाईट प्रकारे प्रभावित करत आहे. व्हायरसचा हा व्हेरिएंट आपल्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा खुप जास्त घातक आहे आणि त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. हा व्हॅक्सीनचा प्रभाव कमी करतो. चीनी संशोधकांनुसार, डेल्टाने संक्रमित लोकांच्या नाकात कोरोना व्हायरसच्या मुळ रूपाच्या तुलनेत 1,260 पट जास्त व्हायरस असतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

डेल्टा इन्फेक्टेडमध्ये जास्त असतो वायरल लोड

काही अमेरिकन संशोधनात हे सुद्धा समोर आले आहे की, डेल्टाने संक्रमित होणार्‍या लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये वायरल लोड त्या लोकांच्या समान आहे, ज्यांना व्हॅक्सीन दिलेली नाही, परंतु याबाबत अजून संपूर्ण शोध होणे बाकी आहे. जेव्हा कुणी व्यक्ती कोरोनोग्रस्त होतो तेव्हा त्यामध्ये लक्षणे दिसण्यास सामान्यपणे सात दिवस लागतात, परंतु डेल्टाने संक्रमित झाल्यास दोन ते तीन दिवसात लक्षणे दिसू लागतात. याचा स्पष्ट अर्थ आहे की डेल्टा थेटपणे प्रतिकारशक्तीला प्रभावित करतो आणि बचावासाठी रूग्णाकडे कमी वेळ राहतो.

शास्त्रज्ञांनुसार डेल्टा व्हेरिएंटमध्ये सुद्धा बदल शक्य आहे आणि डेल्टा प्लस याचीच एक आवृत्ती आहे. भारताने जूनमध्ये डेल्टा प्लसला व्हायरसच्या एका गंभीर आवृत्तीत सहभागी केले होते. परंतु, डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आणि डब्ल्यूएचओ दोघांनीही कोणत्याही प्रकारचा गंभीर इशारा दिलेला नाही.

Lambda Variant :


कोरोनाच्या नवीन धोकादायक आवृत्तीत लॅम्ब्डा व्हेरिएंटचे सुद्धा नाव आहे.
कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट पहिल्यांदा जगासमोर पेरू मध्ये आला होता. लॅम्ब्डा व्हेरिएंटवर डब्ल्यूएचओने सुद्धा आपली प्रतिक्रिया जाहीर केली होती, त्यामुळे शक्यता आहे की, डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे तो दुसर्‍या आजारांना जन्म देऊ शकतो आणि संशोधनातून समोर आले आहे की, त्याच्यात सुद्धा आपले स्वरूप बदलण्याची शक्ती आहे. हा लसीने बनणार्‍या अँटीबॉडीचा विरोध करतो.

The B.1.621 Variant :


कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट पहिल्यांदा कोलंबियामध्ये समोर आला होता.
या व्हेरिएंटने येथे हजारो लोकांचा जीव घेतला.
त्याच्यावर सध्या रिसर्च सुरू आहे आणि आतापर्यंत कोणतेही एक नाव मिळालेले नाही.
अजूनपर्यंत याबाबत हे समोर आले आहे की हा व्हायरस कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना जास्त प्रभावित करतो. ब्रिटन आणि फ्लोरिडामध्ये सुद्धा याची काही प्रकरणे समोर आली आहेत.

तज्ज्ञांनी इशारा जारी केला आहे की, अमेरिकेत जोपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत अमेरिका मोठ्या संकटात पडू शकते.
याचाच अर्थ कोरोनाचे बदलते रूप लस न घेतलेल्यांमध्ये सहज पसरते.
जिथे कमी संख्येने लस दिली गेली आहे तिथे व्हायरसचे नवीन व्हेरिएंट अनियंत्रित आणि जास्त पसरत असल्याचे दिसत आहे.

व्हॅक्सीनेशनदरम्यान हा महत्वाचा विषय आहे की,
कोरोनाच्या विरूद्ध घेतली जात असलेली कोणत्याही प्रकारची व्हॅक्सीन नागरिकांना गंभीर आजारापासून वाचवू शकते.
परंतु व्हायरसच्या संसर्गाला रोखू शकत नाही.
यासाठी SARS-CoV-2 ला पराभूत करण्यासाठी नवीन पीढीला व्हॅक्सीनची आवश्यकता असेल जी संसर्गाला सुद्धा रोखू शकते.

Web Title :- Delta Variant | nose infected with delta contains 1260 times more virus than normal covid 19 virus says research read here full detail about sars cov 2 delta variant

हे देखील वाचा :

Pune News | खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीचा वाचला प्राण

Chhagan Bhujbal | उड्डाणपूल उदघाटन कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने छगन भुजबळ ‘नाराज’; पालकमंत्री म्हणाले…

Jalgaon Crime | तब्बल 8 महिन्यानंतर आत्महत्येमागील कारण आले समोर

Marathi Actor | ‘या’ मराठी अभिनेत्याची मुलगी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात कमावतेय नाव

Related Posts