IMPIMP

Edible Oil Rate | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! खाद्य तेलाच्या दरात घट, जाणून घ्या

by nagesh
Edible Oil Rate | prices edible oils fall know how cheap mustard oil and other know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Edible Oil Rate | सातत्याने वाढणा-या खाद्यातेलाच्या दराने (Edible Oil Rate) जनता मेटाकुटीला आली आहे. अलीकडेच तेलाच्या किंमतीत प्रंचड वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अधिक वैताग सहन करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर आता जनतेला एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central Government) घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरीकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नुकतंच केंद्र सरकारने (Central Government) काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
त्यामध्ये कर कपातीच्या (Tax deduction) निर्णयामुळे खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, तेलाच्या घाऊक दरात झालेल्या घटीचे पडसाद किरकोळ बाजारातही पाहायला मिळणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना एक महत्वपुर्ण दिलासा मिळाला आहे.

देशात 14 सप्टेंबर रोजी शेंगतेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लावर, पाम तेल, नारळ तेल आणि तिळाच्या तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली आहे.
पाम तेलाचा दर 2.50 टक्क्यांच्या घटीसह 12.349 रुपये प्रतिटन इतका नोंदवला गेला.
एका आठवड्यापूर्वी हाच दर 12,666 रुपये इतका होता.
तसेच, तिळाच्या तेलाच्या दरात 2.08 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
तर नारळ तेल 1.72 टक्क्यांनी स्वस्त झालं आहे.
सनफ्लावर ऑइलचा 14 सप्टेंबर आधी 16,176 रुपये प्रतिटन इतका होता.
आता त्यात 1.30 टक्क्यांची घट झाली असून 15,965 रुपये प्रतिटन इतका झाला आहे.
अशी माहिती केंद्र सरकारने (Central Government) दिली आहे.

दरम्यान, तेलाची साठेबाजी टाळण्यासाठी आणि मागणीची पूर्तता होण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता.
त्याचबरोबर, साठेबाजीला आळा घालण्यासाठी देखील अनेक महत्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
यामध्ये तेल निर्मात्या कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्या जवळील तेलाच्या स्टॉकची माहिती एका वेब पोर्टलवर (Web portal) नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
याशिवाय घाऊक विक्रेत्यांना तेलाच्या किमती स्पष्ट स्वरुपात दिसतील अशा पद्धतीनं जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title : Edible Oil Rate | prices edible oils fall know how cheap mustard oil and other know details

हे देखील वाचा :

Raid On Dance Bar | डोंबिवली पूर्वमध्ये नंगा नाच सुरूच; बारवर छापा; 41 जणांना केली अटक

Multibagger Stocks | 11.95 रुपयांच्या ‘या’ शेयरमुळे गुंतवणुकदार झाले ‘मालामाल’, 6 महिन्यात 1 लाख झाले 3.09 लाख; तुमच्याकडे आहे का?

Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

Related Posts