IMPIMP

EPFO News | PF ट्रान्सफर करायचा आहे परंतु UAN माहित नाही का ? मिनिटात असा जाणून घेवू शकता

by nagesh
EPFO News you want to do pf transfer but dont know uan you can get it in minutes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO News | तुम्ही अलीकडे नोकरी (Job) बदलली आहे का? अशा स्थितीत, तुम्हाला जुन्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर (PF Transfer) करायची असेल तर फॉर्म भरण्याची आणि सबमिट करण्याची गरज नाही. आता ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत पीएफ खात्यात डेट ऑफ एक्झिट (Date of Exit) स्वतः भरू शकता. यासोबत तुम्ही पीएफ ट्रान्सफर (PF Transfer Online) करू शकता आणि क्लेम (PF Claim Online) द्वारे पैसेही काढू शकता. (EPFO News)

UAN क्रमांक माहित असणे आवश्यक

पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा UAN (Universal Account No) माहित असणे आवश्यक आहे. यासोबतच युएएन सक्रिय असणे देखील आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला युएएन माहित नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुमचा युएएन जाणून घेऊ शकता. (EPFO News)

युएएन क्रमांक शोधण्याची प्रक्रिया जाणून घेवूयात (Step-by-Step Process to get UAN No) :

1. तुमच्या मोबाईल किंवा संगणकाच्या ब्राउझरवर https://www.epfindia.gov.in/ उघडा.
2. आता Home च्या शेजारील Services वर क्लिक करा.
3. येथे तुम्हाला ’For Employees’ पर्याय मिळेल.
4. ’For Employees’ वर क्लिक करा.
5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
6. येथे डाव्या बाजूला असलेल्या सेवा विभागात Member UAN/ Online Service (OCS/ OTCP) वर क्लिक करा.
7. यासोबत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
8. या पृष्ठावर, Important Links चा विभाग उजव्या बाजूला तळाशी असेल.
9. येथे दुसर्‍या क्रमांकावर तुम्हाला ’Know your UAN’ चा पर्याय दिसेल.
10. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
11. या पेजवर 10 अंकी मोबाईल नंबर टाका.
12. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ’Request OTP’ वर क्लिक करा.
13. यानंतर, ओटीपी टाकण्यासाठी तुमच्या समोर एक रिकामी जागा दिसेल.
14. रिकाम्या जागेत ओटीपी टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि नंतर सबमिट करा.
15. आता एक नवीन पेज तुमच्या समोर येईल.
16 येथे तुमचे नाव प्रविष्ट करा. त्यानंतर जन्मतारीख निवडा. यानंतर, आधार (Aadhaar No)/ PAN / पॅन आणि Member ID मधील कोणताही एक क्रमांक टाका.
17. कॅप्चा कोड टाकल्यानंतर Show My UAN वर क्लिक करा.
18. आता तुमच्या समोर युएएन नंबर येईल.

ही प्रक्रिया करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवावे की तुमचा मोबाइल नंबर तुमच्या EPF खात्याशी जोडलेला आसावा.

Web Title :- EPFO News | you want to do pf transfer but dont know uan you can get it in minutes

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts