IMPIMP

High Court | प्रेमी युगूलांसाठी खुशखबर ! वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार, हाय कोर्टाचा निर्वाळा

by nagesh
High Court | couple elopes to marry in hotel room hc says saat pheras fire lit in utensil is not valid fine

केरळ : वृत्तसंस्था केरळ (Kerala) हाय कोर्टाने (High Court) एक महत्वपुर्ण निर्वाळा केला आहे. वधू-वर उपस्थित नसताना देखील विवाहाची नोंदणी (Marriage registration) करता येणार असल्याचे निर्देश केरळ हाय कोर्टाने दिले आहे. विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टाने याप्रकरणी निर्देश जारी केले आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांची ओळख पटविणे हे एक आव्हान होते, परंतु, पर्याय म्हणून चेहऱ्याची ओळख (Facial recognition) आणि बायोमेट्रीक सारखे तंत्रज्ञान वापरून विवाह नोंदणी करता येणार असल्याचं केरळ हाय कोर्टाने (High Court) सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

न्या. महम्मद मुश्ताक (Justice Mohammed Mushtaq) आणि न्या. कौसर एडप्पागठ (Justice Kauser Adappagath) यांच्या खंडपीठाने केंद्र
सरकारच्या अधिवक्त्यांना या संबंधी पक्षकारांची ओळख पटविण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial recognition) आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्राकडून नितीगत निर्देश देण्यात यावेत असं सांगितले आहे. दरम्यान, खंडपीठाने एकल पीठाचे न्या. पीबी सुरेश कुमार (Justice PB Suresh Kumar) यांच्या निर्णयावर सहमती दर्शविली आहे. वधू-वर उपस्थित नसताना त्यांचा विवाह नोंद करता येऊ शकतो, हे सांगण्यास आता काही हरकत नाही. परंतु, नोंदणी अधिकाऱ्याला या दोघांची ओळख पटविता आली पाहिजे. ऑनलाईनच्या माध्यमातुन ही ओळख पटविण्याच्या प्रक्रियेवर याबाबत विचार केला जावा, असं न्यायमुर्ती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकल पीठाच्या सुनावणीदरम्यान, सरकारचे म्हणणे होते की, विवाह नोंदणी करण्यासाठी वर-वधू
यांची उपस्थिती विवाह नोंदणी (Marriage registration) अधिकाऱ्यासमोर असणे आवश्यक आहे. तर, कोणताही एक पक्ष विवाह नोंदणी कार्यालयातील क्षेत्रीय निवासी असायला हवा. म्हणुन परदेशात राहणाऱ्या लोकांचा विवाह नोंद केला जाऊ शकत नाही. कोर्टाच्या (Kerala High Court) आदेशानुसार अंमलबजावणी झाल्यास याचा फायदा दुसऱ्या शहरात अथवा देशात राहणाऱ्या जोडप्यांना होणार आहे.

Web Title :  High Court | marriage can be registered even absence bride and groom kerala high court

हे देखील वाचा :

Mukesh Ambani | RIL, Jio च्या मुकेश अंबानी यांचा नवा ‘विक्रम’ ! बनले पहिले भारतीय, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप

Ratan Tata | लग्नपत्रिका छापण्यापूर्वीच मोडला होता रतन टाटा यांचा साखरपुडा, जाणून घ्या पूर्ण किस्सा

Related Posts