IMPIMP

Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’

by nagesh
Indo-Tibetan Border Police | inspector father salute to daughter who become officer in itbp photo went viral diksha kamlesh kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indo-Tibetan Border Police | आपण पोलीस दलात कार्यरत असतानाच आपल्या मुलीची पोलीस अधिकारी म्हणून एन्ट्री होणे हे वडिलांसाठी जास्त कौतुकाचं आणि मनाला भाव देणार आहे. मुलीच्या अधिकारी पदापर्यंत पोहचल्याने वडिलांचं स्वप्न साकार होणे अधिक मोलाचे आहे. असाच एक क्षण मनाला आनंद देऊन जातो. तो म्हणजे, इंडो-तिबेटन बॉर्डर (Indo-Tibetan Border Police) पोलिसमध्ये निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या कमलेश कुमार (PI Kamlesh Kumar) यांची मुलगी दीक्षा (Diksha) हिची इंडो-तिबेटन बॉर्डर (Indo-Tibetan border) पोलिसात सध्या सहाय्यक कमांडंट पदावर नेमणूक झालीय. ITBP च्या पासिंग आऊट परेडमध्ये (Passing Out Parade Police) या पदावर नियुक्त झालेल्या २ महिला अधिकाऱ्यांपैकी त्यातली दीक्षा ही एक. पीआय कमलेश कुमार (PI Kamlesh Kumar) यांची मुलगी त्यांच्यासमोर आल्यांनतर PI कुमार यांचा उर भरुन आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उच्चाधिकारी झालेल्या आपल्या मुलीला बघून आनंद गगनात मावेना असं झालं. मुलीला पाहून त्यांनी तिला
कडक सलाम केलाय. हाच फोटो मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. दरम्यान,
पासिंग आऊट परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister
Pushkar Singh Dhami) हे उपस्थित होते, ITBP महासंचालक एस एस देसवाल यांच्यासह मुख्यमंत्री धामी यांनी सहाय्यक कमांडंट (Assistant Commandant) बनलेल्या प्रकृती (Prakruti) आणि दीक्षा (Diksha) या दोन महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बॅच लावली आहे. या पासिंग आऊट परेड दरम्यान, नवीन नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी देशाची सेवा आणि संरक्षण करण्याची शपथ घेतलीय.

ITBP 2016 साली यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या माध्यमातून महिला लढाऊ अधिकाऱ्यांची कंपनी
कमांडर म्हणून भरती केली होती. दीक्षाचीही याच परीक्षेमधून निवड केलीय. तसेच, ITBP अकॅडमी
मसूरीच्या (ITBP Academy Mussoorie) पासिंग आऊट परेडमध्ये (Passing Out
Parade) दीक्षा तिचे वडील कमलेश कुमार यांच्यासमोर आली, त्याक्षणी कमलेश कुमार हे स्वतःला
थांबवू शकले नाहीत. कमलेश यांनी आपल्या मुलीला सॅल्यूट केलं आहे. या दरम्यान, कमलेश कुमार
यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलीबाबतचा अभिमान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. वडील, मुलीचा हा
क्षण ITBP ने आपल्या अधिकृत ट्विटच्या माध्यमातून शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना ITBP
ने असं लिहिलं आहे की, ‘हृदयस्पर्शी फोटोमध्ये पीआय कमलेश कुमार (PI Kamlesh Kumar) यांनी आपल्या अधिकारी झालेल्या मुलीला सलाम केला.

Web Title : Indo-Tibetan Border Police | inspector father salute to daughter who become officer in itbp photo went viral diksha kamlesh kumar

हे देखील वाचा :

Supreme Court | उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर 48 तासात गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा – सुप्रीम कोर्ट

Murder in Alandi | तरुणाचे हात-पाय बांधून फेकले इंद्रायणी नदीत, खून प्रकरणात FIR

State Board CET 2021 | अकरावीसाठीची CET परीक्षा रद्द, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; हाय कोर्टाचे निर्देश

Related Posts