IMPIMP

Maharashtra Dam Water Level | कोयना, भंडारदरा ‘ओव्हर फ्लो’ तर पुण्यातील तीन धरणं 100 % भरली

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) | action against pune and pimpri chinchwad municipal corporations pollution ujani dam frozen PMC PCMC

सरकारसत्ता ऑनलाइन  – Maharashtra Dam Water Level | गेल्या दोन दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पडत असणाऱ्या पावसामुळे वर्षभराची मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. कोयना (Koyana), भंडारदरा (Bhandardara) यासारखी महत्वाची धरणे ओव्हर फ्लो झाली असून दोन्ही धरणातून (Maharashtra Dam Water Level) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर पुण्यातील पानशेत(Panshet), वरसगाव (Varasgaon Dam), भाटघर धरणं (Bhatghar Dam) १०० टक्के भरली आहेत. दरम्यान अजून दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

पुणेकरांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र या वर्षी टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणं ९७ टक्के भरली आहेत. पानशेत (panshet), भाटघर (Bhatghar) आणि वरसगाव धरणं (Varasgaon Dam) १०० टक्के भरले असून टेमघर धरण (Temghar Dam) ९९ टक्के भरलं आहे. त्यामुळे खडकवासलातून ६ हजार ८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली आहे. तुलनेने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार नसली तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुण्यातील धरणे किती टक्के भरली

खडकवासला (Khadakwasla) ९७ टक्के

पानशेत (Panshet) १०० टक्के

भाटघर (Bhatghar) १०० टक्के

वरसगाव धरण (Varasgaon Dam) १०० टक्के

टेमघर धरण (Temghar Dam) ९९ टक्के

कोयनेचे सहा दरवाजे उघडले

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात (Koyna Dam catchment area) पावसाचा जोर चांगलाच वाढला असून,कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ सुरू आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे दरवाजे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग

नाशिकमध्येही (Nashik) पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच १३ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे. तर गंगापूर धरणातून (Gangapur dam) १ हजार ५०० , दारणा धरणातून (Darana dam) १२ हजार क्युसेक तर कडवा धरणामधून (Kadwa dam) २ हजार २०० आणि आळंदी धरणातून (Alandi Dam) ३० क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. याशिवाय वालदेवी धरणातून (Valdevi Dam)
१३० क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे.

भंडारदरा भरलं

नगर जिल्ह्यातील (Nagar district) भंडारदरा धरणावर (Bhandardara dam) अकोले, संगमनेर, रहाता,श्रीरामपूर या तालुक्यांतील हजारो एकर शेती अवलंबून असून अनेक साखर कारखाने, दूध संघ यांचे भवितव्यही या धरणावरच अवलंबून आहे. नुकतच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून साडेतीन हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

अजून काही दिवस पाऊस

पोषक वातावरणामुळे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस सर्वदूर कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरात पर्यंत विस्तारला आहे.याशिवाय बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. मुंबई (Mumbai), रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रातील पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), महाबळेश्वर (Mahabaleshwar), नाशिक (Nashik) भागांत पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), विदर्भातील (Vidarbha) अमरावती (Amravati), चंद्रपूर (Chandrapur), नागपूर (Nagpur), वर्धा (Vardha) आदी भागांत हलका पाऊस झाला.
तर घाटमाथ्यावरील माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी आदी भागांमध्ये गेल्या चोवीस तासांत १०० ते १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भात दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील तीन-चार दिवस पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
त्याचा परिणाम मुंबईसह कोकणावर होणार असून तेथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज पालघर, ठाणे, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
रायगड येथे तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, उद्या आणि परवा (दि.१४ व दि.१५) रायगड (Raigad) सिंधुदुर्ग (Sindhudurg)
जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागांत उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर नंदुरबार (Nandurbar), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon) जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. आज जालना (Jalana), परभणी (Parbhani), बीड (Beed), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :  Maharashtra Dam Water Level | maharashtra rain water levels up in many dams

हे देखील वाचा :

Mumbai News | भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून 16 वर्षाच्या मुलीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Maharashtra Rains | मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार

Satara NCP | आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानं 200 कार्यकर्त्यांसह मनगटावर बांधलं राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’

Related Posts