IMPIMP

Maharashtra Unlock | राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आणि लोकलसंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ

by nagesh
Mumbai Lockdown News | when will lockdown imposed in mumbai and maharashtra rajesh tope made statement on it

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online):  Maharashtra Unlock | राज्यात गेली दोन ते तीन महिने कोरोना विषाणूने (Corona virus) विळखा अगदी गडद केला होता. सध्या तो आटोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध हटवण्याचा विचार राज्य सरकार (State Government) करीत आहेत. महाराष्ट्रातील लॉकडाऊनसह अन्य निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यांपेक्षाहीकमी आहे. अशा जिल्ह्यात लॉकडाऊन पूर्णतः उठवण्याची (Maharashtra Unlock) शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिलीय. येत्या दोन दिवसात राज्यातील निर्बंध आणि लोकलबाबत निर्णय घेऊ असं टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अद्याप अधिक आहे. म्हणून तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. अन्य जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्याबाबत आरोग्य विभागाच्या (Health Ministery) आणि मदत व पुनवर्सन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही फाईल पाठवण्यात येणार आहे. यावरून मुख्यमंत्री ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे. याचबरोबर, महाराष्ट्रातल्या अन्य 25 जिल्ह्यात सकारात्मकता दर (Positivity rate) खूप कमी आहे. ज्या जिल्ह्यात सकारात्मकता वाढीचा दर कमी आहे. त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करत असताना दुकानं 4 ऐवजी अधिक वेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असं देखील टोपेंनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, सध्या सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकल ट्रेननं (Local
train) प्रवास करण्याची मुभा नाही आहे. त्यामुळे यात लस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची
परवानगी द्यायची का नाही यावर देखील येत्या 2-3 दिवसात निर्णय होईल’ तसेच, जगातल्या अनेक देशात
तिसरी लाट आली आहे. परंतु लसीकरण झाल्यानं त्याचा धोका काही प्रमाणात कमी आहे. जरी संक्रमण
होत असलं तरी मृत्यूचं प्रमाण कमी आहे. म्हणून तिसऱ्या लाटेतील संक्रमण गंभीर स्वरुपाचं नाही आहे. अधिक निर्बंध घालून देखील चालणार नाहीत. म्हणूनच राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

Web Title : maharashtra unlock will take decision regarding local train in next two days final decision will be taken by cm said rajesh tope

हे देखील वाचा :

Suspected Death of Judge | हत्या की दुर्घटना ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू, मंत्र्याच्या आदेशानंतर तपासासाठी विशेष पथक (व्हिडीओ)

Link DL With Aadhaar | आतापर्यंत केले नसेल तर आजच करा ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधारसोबत लिंक, जाणून घ्या एकदम सोपी प्रोसेस

Thane Crime | औरंगाबादमधील पोलिस कर्मचार्‍याचा मृतदेह ठाण्यातील फुटपाथवर आढळल्याने प्रचंड खळबळ

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवडयात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Related Posts