IMPIMP

Modi Government | देशाची 60 ‘खरब’ची (Trillion) मालमत्ता विकणार मोदी सरकार; प्लान समोर ठेवून सितारमन म्हणाल्या – ‘मालक सरकारच असणार’

by nagesh
Modi Government | modi government will sell government property worth 60 trillion roadmap will come soon claim in the report

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | मोदी सरकारने देशाची 60 खरबची मालमत्ता विकण्याची तयारी केली आहे (Modi government is all set to sell assets worth Rs 60 trillion). सरकारच्या योजनेवर अंमलबजावणी झाली तर सरकारी मालमत्ता विक्रीचे हे सर्वात मोठे प्रकरण असेल. सरकारने ट्रान्समिशन लाईन टेलिकॉम टॉवर, गॅस पाईपलाईन, विमानतळ, पीएसयूसह सरकारी कंपन्यांच्या अनेक मालमत्ता विकण्याची किंवा भाड्याने देण्याची तयारी केली आहे (government plans to sell or lease several properties). यावर पुढील चार वर्षात अंमलबजावणी करण्याची योजना आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

थिंक टँकने तयार केली योजना

यासंबंधी लोकांनी म्हटले की, सरकारच्या थिंक टँकने अनेक मंत्रालयांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार केली आहे. या योजनेत अशाप्रकारच्या मालमत्तेची यादी तयार केली आहे. पावरग्रीडच्या ट्रान्समिशन लाईन्सपासून बीएसएनएल, एमटीएनएलचे टॉवर, गेलची पाईपलाईन आणि अनेक एयरपोर्ट या यादीत आहेत. या कंपन्यांच्या मालमत्तेच्या विक्रीतून मोदी सरकार 60 खरब रुपये जमवणार आहे.

 हे मिशन अनेक सेक्टर्सला कव्हर करेल – सितारमन

तिकडे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नॅशनल मोनेटायजेशन पाईपलाईन (NMP) प्लानचे अनावर केले. त्यांनी म्हटले की, कमी वापरातील मालमत्तेमधील भागीदारी विकली जाईल. हे मिशन अनेक सेक्टर्सला कव्हर करेल. यामध्ये रोड, रेल्वे, विमानतळापासून पावर ट्रान्समिशन लाईन्स आणि गॅस पाईपलाईन्सचा सुद्धा समावेश आहे.

मालमत्तांचा चांगल्याप्रकारे वापर करणार

अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार आपली कोणतीही संपत्ती विकणार नाही. यांचा चांगल्या पद्धतीने वापर करेल. याचा मालकी हक्क सरकारकडे असेल.

मालमत्ता विकण्याशिवाय खुप कमी पर्याय शिल्लक

अर्थमंत्री निर्मला सीतारमन अगोदरच म्हणाल्या आहेत की, वित्तीय तूट पूर्ण करण्यासाठी सरकार अशाप्रकारच्या संपत्ती विकत आहे. सरकारकडे अशाप्रकारच्या मालमत्ता विकण्याशिवाय खुप कमी पर्याय आहेत. म्हणजेच या संपत्ती विकल्या जाणार हे निश्चित आहे.

लीजवर देण्याऐवजी विकली जाऊ शकते मालमत्ता

सूत्रांचे म्हणणे आहे की, बीएसएनएल आणि एमटीएनएलचे टॉवर लीजवर देण्यासह विकले सुद्धा
जाऊ शकतात. गेलच्या पाईपालाईन बिझनेसला मूळ कंपनीपासून वेगळे केले जाऊ शकते. ती
मोठ्या कालावधीसाठी लीजवर दिली जाऊ शकते विकली जाऊ शकते.

बीएसएनएल, एमटीएनएलचे टॉवर खासगी टेलिकॉम कंपन्यांना अगोदरच भाड्याने दिले आहेत. सरकार रेल्वे आणि रस्त्याशी संबधित मालमत्ता सुद्धा विकण्याच्या तयारीत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Modi Government | modi government will sell government property worth 60 trillion roadmap will come soon claim in the report

हे देखील वाचा :

Gold ETF | गोल्ड ईटीएफमधून पैसे काढून येथून नफा कमावण्यात गुंतले इन्व्हेस्टर्स, कुठे करत आहेत गुंतवणूक, जाणून घ्या

Witchcraft | लज्जास्पद ! जादूटोणाचा आरोप करत एकाच कुटुंबातील 7 लोकांना चौकात बांधून मारले, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

High Court | दाढी ठेवण्यावरील प्रतिबंधाविरूद्धचा अर्ज फेटाळला; HC ने म्हटले – ‘धर्मनिरपेक्ष असावी पोलीस दलाची प्रतिमा’

Related Posts