IMPIMP

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

by nagesh
Mukesh Ambani | mukesh ambani threat case mumbai police arrested the man who threatened by phone call

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mukesh Ambani | जलवायु परिवर्तनावर (Climate Change) होत असलेल्या आंतरराष्ट्रीय शिखर संम्मेलन 2021 (ICS 2021) मध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (CMD Mukesh Ambani) यांनी हरित ऊर्जेच्या (green energy) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पदार्पण करण्याची घोषणा केली.

अंबानी यांनी पुढील तीन वर्षात मोठ्या क्षमतेचे चार उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

मुकेश अंबानी यांनी म्हटले की, समिटमध्ये बोलणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारत आत्मनिर्भरतेचे लक्ष्य अवश्य प्राप्त करेल. क्लायमेट चेंज आज जगासाठी मोठे आव्हान आहे. ज्यास तोंड देण्यासाठी आपल्याला ग्रीन एनर्जीकडे वेगाने जावे लागेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

समिटमध्ये मुकेश अंबानी प्रमुख वक्ते

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PDH Chamber of Commerce & Industry) च्या पर्यावरण समितीच्या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय जलवायु शिखर संमेलन 2021 चा भारत यजमान देश आहे. या संमेलनास पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले. समिटमध्ये रिलायन्सचे चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी प्रमुख वक्ते होते.

अंबानी म्हणाले, आम्ही नवीन उर्जा गुंतवणुकीसाठी सर्व महत्वाच्या उपकरणांचे उत्पादन एकीकरणासाठी चार
मोठे सौर फोटोव्होल्टिक मोड्यूल कारखाने, ऊर्जा साठवण बॅटरी कारखाना, इलेक्ट्रोलायजर कारखाने तसेच
फ्यूएल सेल कारखाना उत्पादन प्रकल्प उपभारण्याची योजना आखली आहे.

अंबानी म्हणाले, भारतात नव हरित क्रांतीची सुरूवात झाली आहे आणि नवीन उर्जेत आत्मनिर्भरतेकडे जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर ग्रीन एनर्जी एकमेव पर्याय आहे.

Web Title : Mukesh Ambani | ics 2021 mukesh ambani announces investment of rs 75000 crore in green energy

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवार भडकले, म्हणाले – ‘त्या’ बातम्या धादांत खोटया

Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स कराराने हॉटेल भाडयाने घेऊन चालविलं जात होतं सेक्स रॅकेट, लोहगाव परिसरातून तिघांना अटक

Related Posts