IMPIMP

‘या’ पाच Mutual Funds ने 20 वर्षात गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या किती टक्के दिला रिटर्न

by nagesh
Mutual Funds | these mutual funds made investors millionaires in 20 years know what return they gave

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mutual Funds | असे कोण म्हणते की, केवळ स्टॉकच मल्टी-बॅगरमध्ये बदलू शकतात? कारण अनेक इक्विटी म्युच्युअल
फंडने सुद्धा मोठ्या कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. आज आम्ही असेच 5 म्युच्युअल फंड निवडले आहेत ज्यांनी 20 वर्षात गुंतवणुकदारांना
करोडपती बनवले आहे (5 Mutual funds that have made investors millionaires in 20 years).

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या योजनांनी मागील 20 वर्षात वार्षिक 23.8-27 टक्के रिटर्न दिला आहे. परंतु खुप कमी गुंतवणुकदारांमध्ये रिटर्न मिळवण्यासाठी 20 वर्षांपर्यंत धैर्य राखण्याची क्षमता असते. परंतु ज्यांनी असे केले, त्यांनी आपले पैसे 100 पट वाढताना पाहिले.

ज्यांनी गुंतवणुकदारांचे पैसे 72-119 पट वाढवले अशा पाच फंडाबाबत (Mutual Funds) जाणून घेवूयात…

1. निप्पॉनने दिला 119 पट रिटर्न (Nippon India Growth Fund)

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड सर्वात जुन्या मिडकॅप योजनांपैकी एक आहे. जी 1995 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडद्वारे सुरूकरण्यात आली होती. Valueresearch च्या आकड्यांनुसार, त्याने 20 वर्षात वार्षिक 27 टक्केचा आश्चर्यकारक रिटर्न दिला आहे. या 20 वर्षात पैसे 119 पट वाढले. जर एखाद्याने 2001 मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते वाढून जवळपास 1.2 कोटी रुपये झाले असते.

2. फ्रँकलिन प्रायमाने सुद्धा बनवले करोडपती (Franklin Prima)

फ्रँकलिन प्रायमाने 20 वर्षात 26.1 टक्के रिटर्न दिला आहे. ही योजना सुद्धा एक मिडकॅप फंड आहे आणि तो 1993 मध्ये सुरू केला होता. जर एखाद्याने 2001 मध्ये फ्रँकलिन प्रायमामध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 1.03 कोटी रुपये मिळाले असते.

 3. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड (ICICI Prudential Technology Fund)

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडने 20 वर्षात वार्षिक 24 टक्के रिटर्न दिला आहे. 2001 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणार्‍याला आता 74.2 लाख रुपये मिळाले असते. ही योजना प्रामुख्याने सॉफ्टवेयर सेवा कंपन्यांच्या शेयरमध्ये गुंतवणूक करते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

4. एसबीआय मॅग्नम ग्लोबल फंड (SBI Magnum Global Fund)

एसबीआय मॅग्नम ग्लोबल फंडने 2001 पासून वार्षिक 24 टक्केचा कंपाऊंडिड रिटर्न दिला आहे. हा एक असा फंड आहे जो भारतात यादीबद्ध एमएनसीचे शेयर आणि काही परदेशी शेयरमध्ये सुद्धा गुंतवणूक करतो. यामध्ये 20 वर्षापूर्वी केलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आता 74.2 लाख रुपये झाले असते. हा फंड 1994 मध्ये सुरू केला होता.

5. एसबीआय काँट्रा (SBI Contra)

एसबीआय काँट्राने मागील 20 वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे. या कालावधी दरम्यान योजनेने वार्षिक 23.9 टक्के रिटर्न दिला आहे. या दोन दशकात 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 72.2 लाख रुपये झाली आहे. नावावरून समजते की ही योजना एक विरूद्ध गुंतवणूक रणनिती फॉलो करते.

Web Title : Mutual Funds | these mutual funds made investors millionaires in 20 years know what return they gave

हे देखील वाचा :

High Court | वस्त्रांवरूनही ‘स्पर्श’ केल्यास लैंगिक अत्याचार; विधिज्ञांचा न्यायालयात युक्तिवाद

Kaun Banega Crorepati | सावधान ! ‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखील पाकिस्तानी हॅकर करताहेत फसवणूक, चुकूनही ‘हा’ नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड करु नका

Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई

Related Posts