IMPIMP

Netherland Cucumber | काकडीची लागवड करून कमावले 8 लाख; जाणून घ्या स्टोरी

by nagesh
Netherland Cucumber | cucumber farming invest less and earn money upto 8 lakh per month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अलीकडच्या काळामध्ये शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू लागला आहे. अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agriculture) वळू लागले आहेत. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (modern technology) देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्त पैसे मिळू लागले आहेत. उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) एका शेतकऱ्याने तर चक्क नेदरलँडच्या काकडीची (Netherland Cucumber) लागवड करून 8 लाख रुपये कमावल्याचे समोर आले आहे. चार महिन्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई केली असून विशेष म्हणजे शासनाकडूनही नेदरलँडच्या काकडीच्या (Netherland Cucumber) उत्पादनासाठी अनुदान मिळत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काकडी या पिकाचा कालावधी साधारण 60 ते 80 दिवसांचा असतो.
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो.
काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते.
परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि वाळू असणारी मातीची जमीन या उत्पादनासाठी चांगली मानली जाते.
नद्या व तलावाच्या काठावरही काकडीची लागवड करता येते.
जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 हा काकडी लागवडीसाठी चांगला मानला जातो.

ज्यांनी काकडीच्या लागवडीतून लाखो रुपये कमावले ते उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गाप्रसाद सांगतात की, नेदरलँडमधील काकड्यांच्या प्रजाती मध्ये बिया नसतात.
त्यामुळे हॉटेल (hotel) आणि रेस्टॉरंट्समध्ये (restaurant) या काकडीची मागणी खूप जास्त आहे.
या काकडीच्या लागवडीसाठी बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतर शेतात सेडनेट हाऊस बांधले.
त्यानंतर स्वत: कडील आणखी 6 लाख रुपये खर्च केला.

याशिवाय नेदरलँड कडून 72 हजार रुपये किमतीचे बियाणे मागवले.
सामान्य काकड्यांच्या तुलनेत ही काकडी दुप्पट पीक देते.
साधारण चार महिन्यानंतर 8 लाख रुपयांची काकडी त्यांनी विकली.
बाजारात स्वदेशी काकडीची किंमत 20 रुपये प्रति किलोच्या आसपास असते.
तर नेदरलँडमधील या काकडीची विक्री 40 ते 45 रुपये किलोच्या हिशोबाने होते.
शिवाय या काकडीची मागणी वर्षभर असते.
त्यामुळे कोणाला सोप्या पद्धतीने पीक घेऊन कमी दिवसात जास्त उत्पन्न घेऊ शकतो.
या काकडीच्या मार्केटिंग (marketing) करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची (social media) मदत घेऊ शकता.

Web Title : Netherland Cucumber | cucumber farming invest less and earn money upto 8 lakh per month

हे देखील वाचा :

MHT-CET 2021 | एमएचटी CET परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु – मंत्री उदय सामंत

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळणार आणखी 1 अपर आयुक्त, 2 DCP, 4 ACP; BDDS ला देखील राज्य शासनाची मंजुरी

Related Posts