IMPIMP

PM Garib Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये सरकारने दिली आणखी एक मोठी सुविधा; हजारो लोकांना होणार लाभ

by nagesh
PM Gareeb Kalyan Yojana | Pradhan Mantri Garib Kalyan Yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  PM Garib Kalyan Yojana | जर तुम्ही गरीब कल्याण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे आरोग्य कर्मचारी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (PM Garib Kalyan Yojana) अंतर्गत विमा योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता आणखी फायदा मिळेल. कोविडच्या दरम्यान देशातील जनता उपचारापासून वंचित होऊ नये, यासाठी सरकाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) ची घोषणा केली होती. आता कोविड महामारीची शक्यता पाहता सरकारने त्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन घोषणेनुसार सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा (PM Garib Kalyan Scheme) कालावधी 180 दिवसांसाठी वाढवला आहे.
सरकार या योजनेच्या अंतर्गत गरीब वर्गातील लोकांना विमा पॉलिसीचा लाभ देते. विमा पॉलिसीचा सध्याचा कालावधी 20 ऑक्टोबरला समाप्त झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

परंतु, सरकारने लोकांची मागणी पाहता तिचा कालावधी पुढे 180 दिवसांसाठी वाढवली आहे.
आता 6 महिने अतिरिक्त विमा पॉलिसीचा लाभ घेता येऊ शकतो.
एका रिपोर्टनुसार, सरकारने PMGKP च्या अंतर्गत आतापर्यंत 1351 विमासंबंधी दावे निकाली काढले आहेत.

कधी लागू झाले होते पॅकेज

पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची सुरुवात 30 मार्च 2020 ला करण्यात आली होती.
ही योजना कोविडविरूद्ध लढत असलेले आणि पुढील फळीत तैनात आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी सुरू केली होती.
या योजनेत आरोग्य कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांचे कव्हर दिले जाते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : PM Garib Kalyan Yojana | pradhan mantri garib kalyan package insurance cover for health workers fighting covid 19 extended to 180 days

हे देखील वाचा :

Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

Related Posts