IMPIMP

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! जर खात्यात अजूनही आले नसतील 2000 रुपये, तर ‘या’ पध्दतीनं करा ‘क्लेम’, जाणून घ्या

by nagesh
PM Kisan | good news pm kisan beneficiaries will get credit of rs 4000 instead of 2000 in 10th installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan samman nidhi scheme) लाभ घेत असाल, परंतु हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत खात्यात आले नसतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. लाभार्थीची कागदपत्र पूर्ण नसल्याने किंवा आधार, बँक अकाऊंट नंबर आणि आयएफसी कोड चुकीचा असल्याने अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत. जर असे काही तुमच्या बाबतीत झाले असेल तर ताबडतोब चुक दुरूस्त करा, अन्यथा तुमच्या खात्यात पुढील हप्ता सुद्धा येणार नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जाणून घ्या केव्हा येतो हप्ता?
शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यात पाठवले जातात. दर 4 महिन्यात 2000 रुपयांचा हप्ता येतो. PM Kisan पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात येतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो.

कोणत्या कारणामुळे अडकतात पैसे?
बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.

IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.

शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.

गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.

हप्ता न मिळाल्यास येथे करा तक्रार
PM Kisan Scheme योजनेच्या हप्त्याची माहिती घेण्यासाठी टोल फ्री नंबर 1800115526 वर कॉल करून तक्रार करू शकता. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार, चौकशीसाठी हेल्पलाईन नंबर 155261 किंवा Toll Free नंबर 1800115526 वर सुद्धा कॉल करू शकता. तसचे कृषी मंत्रालयाकडून जारी नंबर 011-23381092 वर सुद्धा कॉल करू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मंत्रालयाशी असा करा संपर्क

PM Kisan टोल फ्री नंबर : 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर :155261

PM Kisan लँडलाईन नंबर्स : 011्र23381092, 23382401

पीएम किसान नवीन हेल्पलाईन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पालाईन : 0120-6025109

ई-मेल आयडी : [email protected]

अशाप्रकार चे करा तुमच्या पैशांचे स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

Web Title :- PM Kisan | farmer has not received 2000 rupees under pm kisan scheme then complaint this number

हे देखील वाचा :

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान

GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या

Related Posts