IMPIMP

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 6 हजार रुपये, लवकर पूर्ण करा ‘हे’ काम

by nagesh
PM Kisan Yojana | 6 thousand rupees are going to come in the account of farmers complete this work soon

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत मोदी सरकार देशातील सर्व शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयांचा हप्ता टाकते. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 10 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत.

परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही ई – केवायसी पूर्ण केले नसेल, तर यावेळी तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार नाही. ई – केवायसी म्हणजेच बँक खात्यासह, तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे देखील सबमिट करावी लागतील आणि तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लागेल. (PM Kisan Yojana)

असे पूर्ण करा eKYC
जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन तुमचे केवायसी पूर्ण करू शकता. परंतु हे काम घरबसल्या करायचे असेल तर ही सुविधाही उपलब्ध आहे.

तुम्हाला तुमचे ई – केवायसी 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करावे लागेल.

यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेचे अधिकृत पोर्टल https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या आणि होमपेजवरील Farmers Corner वर क्लिक करा.

यानंतर, ई – केवायसी पर्याय निवडून एक नवीन पेज ओपन होईल. आधार कार्डची माहिती दिल्यानंतर आता सर्च टॅबवर क्लिक करा.

यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा,
तुमचे ई – केवायसी आता पूर्ण झाले आहे आणि आता 6,000 रुपयांचा 11 वा हप्ता देखील तुमच्या खात्यात येईल.

– या योजनेचा लाभ फक्त नोंदणीकृत शेतकर्‍यांनाच मिळतो.

पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6,000 रुपये मिळतात,
ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जारी केली जाते,
जी दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकर्‍यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

Web Title :- PM Kisan Yojana | 6 thousand rupees are going to come in the account of farmers complete this work soon

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

PMC New Water Connection | …म्हणून पुणेकरांना पुढील काही दिवस मिळणार नाही नवं पाणी कनेक्शन, पुणे महापालिकेचा निर्णय

Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

Related Posts