IMPIMP

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी

by nagesh
Modi Government | autopsy will be possible after sunset union health minister announces modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Narendra Modi | पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी म्हटले की, काही लोक मानवाधिकाराच्या नावावर देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला अशा लोकांपासून सावध राहावे लागेल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापना दिनाच्या (foundation day of the National Human Rights Commission) निमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

700 जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर

यासोबतच त्यांनी मानवाधिकार आणि महिलांसाठी करण्यात आलेल्या कामांचा सुद्धा उल्लेख केला.
पीएम मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी 700 जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.

650 पेक्षा जास्त फास्ट ट्रॅक कोर्ट

येथे मेडिकल, पोलीस, मेंटल कौन्सिलिंग आणि लीगल हेल्प दिली जाते. याशिवाय 650 पेक्षा जास्त फास्ट ट्रॅक कोर्टसुद्धा स्थापन करण्यात आली आहेत.
यामध्ये बलात्कारांसारख्या गंभीर प्रकरणांची सुनावणी केली जात आहे.

मुस्लिम महिलांना अधिकार दिला

Muslim महिलांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी तीन तलाकविरूद्ध कायदा बनवण्याबाबत सुद्धा त्यांनी उल्लेख केला.
पीएम मोदी यांनी म्हटले, दशकांपासून मुस्लिम महिला तीन तलाकविरूद्ध कायद्याची मागणी करत होत्या. आम्ही त्यांना अधिकार प्रदान केला.

मुस्लिम महिलांना ’महरम’ पासून मुक्त केले

याशिवाय हजदरम्यान मुस्लिम महिलांना आम्ही ’महरम’ पासून सुद्धा मुक्त करण्याचे काम केले आहे.
आपल्याच सरकारची पाठ थोपटत मोदी म्हणाले, गरीब लोकांना जेव्हा टॉयलेट, कुकिंग गॅससारख्या मुलभूत सुविधा मिळतात त्यांच्या अपेक्षा आणखी वाढत जातात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मॅटर्निटी लीव्हचा सुद्धा केला उल्लेख

तीन तलाकविरूद्ध कायद्याशिवाय पीएम मोदी यांनी महिलांसाठी 26 आठवड्यांच्या मॅटरनिटी लीव्हची तरतूद केल्याचा उल्लेख केला.
त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्या संघर्ष आणि आपला इतिहास मानवाधिकाराची मूल्ये आणि प्रेरणा यांचा मोठा स्त्रोत आहे.

मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आपल्या इथे लोकशाही आणि अधिकार कायम राहिले आहेत.
परंतु अनेक असे देश आहेत, जिथे मागील दशकात हे अधिकार हिसकावण्यात आले आहेत.

मानवाधिकारांवर सिलेक्टिव्ह भूमिकेमुळे देशाचे नुकसान

पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मानवाधिकारांबाबत काहीजणाचा सिलेक्टिव्ह अप्रोच असल्याचा आरोप करत म्हटले की,
काही लोक एखाद्या घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे म्हणतात, परंतु तशाच एखाद्या अन्य घटनेबाबत हे लोक गप्प बसतात.

पीएम मोदी यांनी म्हटले की, अशाप्रकारचे सिलेक्टिव्ह वागणे लोकशाहीसाठी हानिकारक आहे.
असे लोक आपल्या वागण्याने देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) सुद्धा उपस्थित होते.

Web Title : PM Narendra Modi | pm narendra modi speech in nhrc event some people trying to tarnish image of country

हे देखील वाचा :

Akshay Kumar | अक्षय कुमारचे ‘रक्षा बंधन’ पूर्ण झाले ‘नवरात्री’मध्ये

Pune Crime | हत्या की आत्महत्या ? पुण्याच्या कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ; पोलिसांचा तपास सुरू

PMPML | लवकरच पुण्याच्या रस्त्यावर धावणार पीएमपीच्या वातानुकूलित कॅब

Related Posts