IMPIMP

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

by nagesh
R. Ashwin | india vs new zealand r ashwin is attacking option for a captain says rohit sharma t20 world cup 2022 marathi news policenama

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) 73 रनने दणदणीत विजय झाला. या विजयाने भारताने 3 टी-20 मॅचची सीरिज 3-0 ने जिंकत न्यूझीलंडला व्हाईट वॉश (White Wash) दिला आहे. या सिरीजनंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आर अश्विनचे (R Ashwin) तोंड भरून कौतुक केले. आर अश्विनने (R Ashwin) जवळजवळ चार वर्षांनी मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केले आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करत मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्याबरोबरच त्याने विकेट्सही घेतल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

या सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला, आर अश्विन (R. Ashwin) कोणत्याही कर्णधारासाठी नेहमीच आक्रमक पर्याय असतो.
जेव्हा तुमच्या संघात त्याच्यासारखा गोलंदाज असतो तेव्हा तुम्हाला मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याची संधी मिळते आणि हा टप्पा किती महत्त्वाचा आहे.
हे आम्हाला माहीत आहे. त्याने अप्रतिम पुनरागमन केले आहे.
तो एक महान गोलंदाज आहे आणि हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.
तसेच, त्याने गेल्या काही वर्षांत कसोटी सामन्यांमध्ये आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे.
त्याने या सिरीजमध्ये केलेली गोलंदाजी त्याची क्षमता दर्शवते.

कोणत्याही सामन्यांत मधल्या ओव्हरमध्ये तुम्हाला रन रेटवर नियंत्रण ठेवण्याची आणि विकेट्स मिळवण्याची गरज असते आणि अश्विनने (R Ashwin)
अक्षरसह ती भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली.
अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर.अश्विन हे दोन्ही पर्याय मधल्या षटकांमध्ये विकेट्स मिळवण्यासाठी आहेत.
त्यामुळे कर्णधारासाठी, त्याच्यासारख्या गोलंदाजांची उपस्थिती चांगले पर्याय उपलब्ध करून देते.
असे रोहित यावेळी बोलला. रोहितच्या या वक्तव्यावरुन येणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये अश्विनचे स्थान पक्के असल्याचे समजत आहे.

Web Title : R. Ashwin | india vs new zealand r ashwin is attacking option for a captain says rohit sharma t20 world cup 2022 marathi news policenama

हे देखील वाचा :

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Related Posts