IMPIMP

Ration Card | खुशखबर ! आता रेशन कार्डसंबंधीत ‘या’ मोठ्या सेवा मिळताहेत ऑनलाइन, जाणून घ्या काय करावे लागेल?

by nagesh
Ration Card | now all these services related to ration card are getting online know what to do check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRation Card | रेशन कार्ड (Ration Card) द्वारेच सरकार आपल्या राज्यात राहणार्‍या गरीब कुटुंबांना रेशन पुरवठा करते. मात्र, अनेकदा असे सुद्धा होते की, रेशन कार्ड अपडेट करणे किंवा त्याची डुप्लीकेट कॉपी बनवणे किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज (How to apply ration card) करण्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात. मात्र, आता सरकार आपल्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत ऑनलाइन सेवा देत आहे.

आता तुम्ही रेशन कार्डसंबंधी (Ration Card) सेवांसाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर अ‍ॅक्सेस करू शकता. याची माहिती डिजिटल इंडियाने एका ट्विटद्वारे दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हटले डिजिटल इंडियाने?

डिजिटल इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटल हँडलवर म्हटले, कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेने इलेक्टॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासह एक करारावर हस्ताक्षर केले आहे. यामुळे देशभरात 3.70 लाख सीएससीच्या माध्यमातून रेशन कार्ड सेवा उपलब्ध केली जाईल. या भागीदारीमुळे देशभरात 23.64 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना लाभ होण्याची आशा आहे.

सीएससीवर या सेवा मिळतील

1. कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डची माहिती अपडेट करणे.

2. आधार सीडिंगसुद्धा करता येईल.

3. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटसुद्धा काढू शकता.

4. रेशनच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊ शकता.

5. रेशन कार्डसंबंधी तक्रार सुद्धा करू शकता.

6. रेशन कार्ड हरवले तर नवीन कार्डसाठी अर्ज करू शकता.

हे लोक करू शकतात रेशन कार्डसाठी अर्ज

देशातील प्रत्येक नागरिक ज्याच्याकडे भारताचे नागरिकत्व आहे तो रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाच्या खालील मुलांची नावे आई-वडिलांच्या रेशनकार्डमध्ये असतील. तर 18 वर्षावरील लोक वेगळे रेशन कार्ड काढू शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उत्पन्नाच्या आधारवर तयार केले जाते रेशन कार्ड

सामान्यपणे तीन प्रकारचे रेशन कार्ड तयार केले जाते. गरीबी रेषेच्या वरील लोकांना एपीएल (APL), गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी बीपीएल (BPL) आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय (Antyodaya). ही वर्गवारी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरवली जाते.

यशिवाय वेगवगेळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात मिळणार्‍या वस्तू, त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. गरीबी रेषेच्या खाली किंवा अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र जमा करावे लागतात.

Web Title : Ration Card | now all these services related to ration card are getting online know what to do check details

हे देखील वाचा :

BJP vs Shivsena | ‘सामना’तून अमित शहांसह भाजप नेत्यांवर टीकेचे बाण ! … तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीत ‘पराभूत’

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

Related Posts