IMPIMP

Corona दरम्यान Sepsis चा वाढला धोका, कॅन्सर आणि हार्टअटॅकने सुद्धा जाऊ शकतो जास्त लोकांचा जीव

by nagesh
Sepsis | sepsis will kill more people than cancer heart attack by 2050 over coronavirus infection

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sepsis | कोरोना व्हायरस (Corona virus) आपल्या शरीराला पोखरत आहे. विशेषता ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती (Immunity) कमजोर आहे किंवा जे लोक अगोदर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी धोका जास्त आहे. कोरोना संक्रमित झाल्यास सेप्सिस (Sepsis) चा धोका वाढतो. सेप्सिस कॅन्सर आणि हार्टअटॅकपेक्षा सुद्धा धोकादायक होत आहे. याबाबत WHO ने सावध केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

भितीदायक आहेत आकडे

डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनुसार 2050 पर्यंत कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा सुद्धा जास्त सेप्सिसने लोकांचा मृत्यू होण्याची शंका आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सेप्सिस इन्फेक्शन एक सिंड्रोमिक रिअ‍ॅक्शन आहे आणि जगभरात संसर्गजन्य रोग मृत्यूचे मोठे कारण आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात समजले आहे की, 2017 मध्ये जगभरात 4.89 कोटी प्रकरणे समोर आली होती आणि 1.1 कोटी सेप्सिसशी संबंधीत मृत्यू झाले, जे ग्लोबल डेथ नंबर्सच्या जवळपास 20 टक्के आहेत.

काय आहे कारण?

संशोधनात हे समजले आहे की, अफगाणिस्तान (Afghanistan) वगळता इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सेप्सिसने मृत्यूदर जास्त आहे. गुरुग्रामचे इन्स्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अँड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता – द मेडिसिटीचे चेयरमन, यतिन मेहता यांनी म्हटले, सेप्सिस 2050 पर्यंत कॅन्सर किंवा हृदयाच्या झटक्याच्या तुलनेत जास्त लोकांचा जीव घेईल.

हा सर्वात मोठा मारेकरी होऊ पहात आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, अँटीबायोटिक औषधांच्या अति वापरामुळे कदाचित हायडेथचे कारण ठरत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Sepsis | sepsis will kill more people than cancer heart attack by 2050 over coronavirus infection

हे देखील वाचा :

Coronavirus | घराच्या आत 6 फुटाचे अंतर ठेवून सुद्धा पसरू शकतो ‘कोरोना’, संशोधनात दावा

Gold Price Update | सोने खरेदीदार खुश ! आता 27644 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम सोने, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

Tirupati Devasthan Trust | ‘मातोश्री’वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना ‘कॉल’; ‘तिरुपती ट्रस्ट’च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

Related Posts