IMPIMP

Sukanya Samriddhi Yojana | सरकारच्या ‘या’ स्कीम अंतर्गत तुमच्या मुलीला मिळतील पूर्ण 15 लाख रुपये, विवाह किंवा शिक्षण कुठेही करू शकता वापर

by nagesh
SSY | sukanya samriddhi yojana save 1 rupee daily and earn 15 lakh at maturity check details know how SSY

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sukanya Samriddhi Yojana | तुम्ही मुलीच्या भविष्याबाबत चिंतीत होण्याची गरज नाही. आज आम्ही मोदी सरकारच्या (Modi Government) अशा योजनेबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये मुलीचे शिक्षण किंवा विवाहासाठी पूर्ण 15 लाख रुपये मिळतील. या सरकारी योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

250 रुपये गुंतवावे लागतात

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

कुठेही उघडू शकता खाते

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे. तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.

किती मिळत आहे व्याज

आता एसएसवाय (Sukanya Samriddhi Account) मध्ये 7.6 टक्केच्या दराने व्याज दिले जात आहे जे इन्कम टॅक्स सूटसह आहे.

21 वर्षानंतर मिळतील पैसे

हे अकाऊंट मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत सुरू ठेवता येऊ शकता. तुम्ही मॅच्युरिटी अमाऊंट मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर काढू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता

मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

अशाप्रकारे मिळतील 15 लाख

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील.
21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल.
सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

Web Title: Sukanya Samriddhi Yojana | sukanya samriddhi yojana you can get 15 lakh rupees on maturity know about it here

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Diabetes | आंधळेपणा-किडनी फेल, ‘या’ 6 अवयवांना सर्वप्रथम डॅमेज करतो डायबिटीज

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गंजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Related Posts