IMPIMP

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

by nagesh
Supriya Sule | NCP MP supriya sules reply critics viral dance video sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या मुलीचा विवाह २९ नोव्हेंबरला पार पडला. विवाहात संगीत कार्यक्रमाचे (wedding sangeet program) आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका गाण्याच्या तालावर ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) या दोन दिग्गज नेत्यांच्या डान्सवर काही जणांनी टीका केली आहे. त्या टिकेला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी एक दिवस अगोदर राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास सुळे यांनी कुटुंबासमवेत हजेरी लावली तसेच राऊत यांच्याबरोबर गाण्यावर ठेकाही धरला.
त्यावरून होणाऱ्या टिकेल उत्तर देताना सुळे म्हणाल्या, आमच्या घरातील मुलीचं लग्न होत. तो एक कौटुंबिक कार्यक्रम आहे.
त्यामध्ये बाहेरच कोणी नव्हतं. एका खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर कोणाला टीका करायची असेल तर काय बोलणार? असा प्रतिप्रश्न सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री हीच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (thane collector rajesh narvekar) यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली.
लग्नाआधी झालेल्या कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा डान्स लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला.
सध्या सोशल मीडियावर हा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर या डान्सचे अनेकांनी कौतुक केलं आहे तर काहींनी टीका केली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट टीका करत, दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलंय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Supriya Sule | NCP MP supriya sules reply critics viral dance video sanjay raut

हे देखील वाचा :

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

Pune Crime | पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयातच पतीने पत्नीचा एका बुक्कीत पाडला दात

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा

Related Posts