IMPIMP

Svamitva Scheme | PM मोदींकडून 1.71 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्डचं वाटप, पंतप्रधान म्हणाले – ‘आता सरकारकडे गरीबांनी फेर्‍या मारण्याचे युग संपले’

by nagesh
Modi Government | modi government has reduced interest rates on housing loans for central government employees

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSvamitva Scheme | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशात स्वामित्व योजनेंतर्गत (Svamitva Scheme) 1.71 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्ड (e-property cards) चे वितरण केले. यानंतर पीएम मोदी यांनी स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. पीएम मोदी म्हणाले, देशाने ते युग मागे टाकले आहे जेव्हा गरीबाला एक-एक पैसा, आणि एका-एका गोष्टीसाठी सरकारकडे फेर्‍या माराव्या लागत होत्या. आता गरीबाच्या जवळ सरकार स्वता जाते. त्यांना सशक्त करत आहे.

PM मोदी म्हणाले, ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे शेतकर्‍यांना, मजुरांना, दुर्गम भागांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी अलिकडेच धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.
आधुनिक ड्रोन मोठ्या संख्येने भारतात तयार व्हावेत, यामध्ये सुद्धा भारत आत्मनिर्भर (Atmanirbhay Bharat) व्हावा, यासाठी PLI स्कीमची घोषणा केली आहे. (Svamitva Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ते म्हणाले, मुद्रा योजने (Mudra Yojna) त लोकांना विना गॅरंटी कर्ज देण्याची संधी बँकांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत मागील 6 वर्षात सुमारे 29 कोटी लोकांना कर्ज दिले गेले आहे. सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. PM Modi म्हणाले, स्वामित्व योजने (Swamitva Yojana)
मुळे लोकांना बँकेकडून कर्ज घेणे आणखीच सोपे झाले आहे. हे प्रॉपर्टी कार्ड लाभार्थ्यांच्या समृद्धीचे साधन बनेल.
हे लोग डिजीलॉकरच्या माध्यमातून आपल्या फोनवर आपले प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करू शकतात.

गावांच्या विकासावर जोर देत मोदी म्हणाले, गावांची जी ताकद आहे, गावातील लोकांची जी जमीन आहे.
जे घर आहे, त्याचा उपयोगी गावातील लोक आपल्या विकासासाठी पूर्णपणे करू शकत नव्हते.
उलट, गावातील जमीन, घर, शेतीवरून वाद, भांडणे-हाणामार्‍या, बेकायदेशीर कब्जा यामध्ये लोकांची उर्जा, वेळ आणि पैसा बरबाद होत होता.

Svamitva Yojana बनत आहे गावांची ताकद

त्यांनी म्हटले, आपणे हे नेहमी म्हणतो की भारताचा आत्मा गावांमध्ये आहे.
परंतु स्वातंत्र्याची अनेक दशके गेली. भारतातील गावांचे सामर्थ्य जखडून ठेवले गेले होते.
देशातील गावांना, गावांच्या प्रॉपर्टीला, जमीन आणि घरासंबंधी रेकॉर्डला अनिश्चित आणि अविश्वासातून बाहेर काढणे खुप आवश्यक आहे.
यासाठी पीएम स्वामित्व योजना, गावातील आपले बांधव आणि भगिनींची खुप मोठी ताकद बनत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वामित्व योजना, केवळ कायदेशीर कागदपत्र देण्याची योजना नाही.
तर ही आधुनिक टेक्नॉलॉजीने देशातील गावांना विकास आणि विश्वासाचा नवीन मंत्र सुद्धा आहे.

आता सरकार गरिबांकडे जात आहे

मोदी म्हणाले, मागील 6-7 वर्षात आम्ही प्रयत्न केला की, गरीबाला इतर कुणाकडे हात पसरण्याची आवश्यकता पडू नये.
आज शेतीच्या छोट्या-छोट्या गरजांसाठी पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जात आहेत.
ते युग देशाने मागे टाकले जेव्हा गरीबाला एक-एक पैसा आणि एका-एका गोष्टीसाठी सरकारकडे फेर्‍या माराव्या लागत होत्या.
आता गरीबाकडे सरकार स्वता जात आहे आणि गरीबाला सशक्त करत आहे.

Web Title : Svamitva Scheme | pm narendra modi said svamitva scheme is not just a scheme but also a new mantra for development of villages in country

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 117 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा ‘भ्रष्टाचार’ ! भाजपचा पर्दाफाश करा; काँग्रेसजनांनो एकदिलाने महापालिका निवडणूक लढवा – काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (Video)

Agra-Mumbai Highway | SUV गाडीचा भीषण अपघात, 3 पोलिसांसह चार ठार

Related Posts