IMPIMP

University Grants Commission | भारतातील 24 विद्यापीठं बोगस ! UP प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

by nagesh
University Grants Commission | education minister dharmendra pradhan 24 universities declared fake by ugc most from up

नवी दिल्ली : वृत्तसंस्था University Grants Commission | देशभरातील उच्च शिक्षणाचे जाळे दाट होत असतानाच देशात बनावट विद्यापीठांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) देशातील तब्बल 24 स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं असून 2 विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. याबाबत माहीती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांनी दिली आहे. लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उत्तर देत याबाबत माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यावेळी माहिती देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच, प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 24 विद्यापीठांना बोगस घोषित करण्यात आलं आहे. ‘याव्यतिरिक्त लखनऊ येथील भारतीय शिक्षा परिषद तसेच, नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटकडून (Indian Institute of Planning and Management) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं उघडकीस आलं आहे. यानुसार या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

अधिकतर सर्वाधिक बोगस विद्यापीठे असणाऱ्यांत उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो.
उत्तर प्रदेशमध्ये 8 बोगस विद्यापीठं आहेत. तर दिल्लीत 7 तसेच,
ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी 2 बोगस विद्यापीठं आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी 1 विद्यापीठ आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचं नाव समोर आलं आहे.
ते विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं त्या विद्यापीठाचं नाव आहे.

या ,दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या विद्यापीठांसंदर्भात हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केलीय.
त्याचबरोबर आयोगाने राज्याचे सचिव, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्या अख्त्यारित असणाऱ्या अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.
त्याचबरोबर अवैध पदवी देणाऱ्या या संस्थांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांनी सांगितलं आहे.

Web Title :- University Grants Commission | education minister dharmendra pradhan 24 universities declared fake by ugc most from up

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यावरील निर्बंधांचा तातडीने फेरविचार करावा; व्यापारी, कष्टकरी, उद्योजक यांना राज्य सरकारने दिलासा द्यावा – माजी आमदार मोहन जोशी

Crime News | धक्कादायक ! कारमध्ये ‘सेक्स’ करताना 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Shrimant Dagdusheth Ganpati Trust | दुकाने आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरे का नाही, श्रीमंत दगडूशेट गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल

Related Posts