IMPIMP

Witchcraft | लज्जास्पद ! जादूटोणाचा आरोप करत एकाच कुटुंबातील 7 लोकांना चौकात बांधून मारले, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Witchcraft | 7 members of a family tied and beaten on road for allegedly doing witchcraft in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Witchcraft | महाराष्ट्र आणि तेलंगनाच्या सीमेवरील गाव वानी खुर्दमध्ये ग्रामस्थांनी जादूटोणा (Witchcraft) केल्याचा आरोप करत एकाच कुटुंबातील 7 लोकांना चौकात बांधले आणि नंतर अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. पीडितांमध्ये चार महिला आणि तीन ज्येष्ठांचा समावेश आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 12 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, पीडित व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मारहाणीत जबर जखमी झालेल्या 5 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही भयंकर घटना समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले की, या घटनेनंतर गावात शांतता आणि सुव्यवस्थेबाबत सरपंच आणि पोलीस दलाने बैठक घेतली आहे.

स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी गावात योग्य ते पोलीस बळ तैनात केले आहे. त्यांनी सांगितले की,
सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.

Web Title : Witchcraft | 7 members of a family tied and beaten on road for allegedly doing witchcraft in maharashtra

हे देखील वाचा :

High Court | दाढी ठेवण्यावरील प्रतिबंधाविरूद्धचा अर्ज फेटाळला; HC ने म्हटले – ‘धर्मनिरपेक्ष असावी पोलीस दलाची प्रतिमा’

Pune Crime | पुण्याच्या गुलटेकडी परिसरात गुंडांचा हैदोस ! तरुणावर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Delta Plus Variant | मुंबईत 128 नमून्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला, महाराष्ट्रात डेल्टा प्लसची 27 नवीन प्रकरणे

Related Posts