IMPIMP

MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू, विद्यार्थ्यांना मिळणार महत्वाची माहिती

by nagesh
MPSC on Twitter | mpsc launches twitter handle to answer students problems

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीने एक महत्वाचं पाउल उचललं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आपलं अधिकृत ट्विटर हँडल (MPSC On Twitter) सुरु करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी MPSC ने मोठं पाऊल उचलले आहे.
शुक्रवारी एमपीएससीने आपलं अधिकृत ट्विटर हँडल (Twitter handle) सुरु केलं आहे.
या माध्यमातून विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.
याबाबत एमपीएससीने (शुक्रवारी) २७ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिकृत माहिती दिलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
संकेत स्थळावरील सूचनांनुसार उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेअगोदर उपलब्ध करून घ्यावीत.
असं MPSC ने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
तर, MPSC ने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी हा रिप्लायचा पर्याय बंद करण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केलीय.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घाबरताय का?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Web Title : MPSC on Twitter | mpsc launches twitter handle to answer students problems

हे देखील वाचा :

Shivsena Vs BJP | शिवसेनेतील नाराज आमदार माझ्या संपर्कात: नारायण राणे

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल

Mumbai High Court | राज्य शासनाच्या शालेय ‘फी’ कपातीच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान

Related Posts