IMPIMP

नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले, काळजी घेण्याचे आवाहन

by amol
Pune-Pimpri Corona Updates | Great relief to Punekar, Pimpri-Chinchwadkar! More than 13,000 corona-free patients a day

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) गेल्या 10 दिवसात विदर्भातील 5 जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्याचं चित्र आहे. यात नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी दैनंदिन सरासरी कोरोनाचे 35 ते 40 रुग्ण आढळून येत होते. आजच्या स्थितीत नागपूरात दैनंदिन 600 रुग्ण आढळून येत आहेत. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात 200 आणि यवतमाळमध्ये 100 च्यावर रुग्ण आढळत आहेत. रोज यात वाढ होत आहे. तुलनेनं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्णसंख्या स्थिर आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 100 च्या जवळ पोहोचली आहे.

नागपूरात पाय रोवतोय कोरोना

नागपूर शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काल (बुधवार दि 17) नागपूर जिल्ह्यात तब्बल 596 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 लोक मृत पावले आहेत. यापैकी नागपूर शहरातील बाधितांचा आकडा हा 499 एवढा आहे. त्यामुळं आता नागपूर महानगरपालिकेला खडबडून जाग आली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागपूरकरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देतानाच नागरिकांमध्ये कोरोना बाबत असलेल्या निष्काळजीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नागपुरात मेडिकल कॉलेजलाच कोरोनानं विळखा घातला आहे.
नागपूर मेडिकल कॉलेजमधील 30 डॉक्टर्स, 3 नर्स यासह एकूण 38 जणांना कोरनाची लागण झाली आहे. यामुळं खळबळ उडाली आहे.
यात डेंटल कॉलेजमधील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि 3 स्टाफ नर्स यांचा समावेश आहे.
शहरातील खामला, जयताळा, स्वावलंबीनग, अयोध्यानगर, न्यू बीडी पेठ, वाठोडा, जरीपटका, जाफरनगर येथे कोरोना रुग्ण वाढत आहेत.

अमरावती विभागात 4 जिल्ह्यात वाढले कोरोना रुग्ण

अमरावतीत कोरोनाच्या (Coronavirus) रुग्ण संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याचं दिसत आहे.
बुधवारी एकाच दिवशी तबब्ल 498 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्याात 199, अकोला जिल्ह्यात 147 नवीन रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू, यवतमाळमध्ये 109 नवीन रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

कंगनाच्या सुरक्षेवर नेमका खर्च किती येतो ? HM अमित शाह यांच्या गृहमंत्रालयानं दिलं ‘अजब’ उत्तर

Related Posts