IMPIMP

अमरावती : दुर्दैवी ! पाळण्याच्या दोरीचा फास लागून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

by sikandershaikh
sorrowness-family-girl-dies

अमरावती (amravati news) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)amravati news |इयत्ता 5 वीत शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीचा घरातील पाळण्याच्या दोरीचा फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दर्यापूर येथील आठवडी बाजार परिसरात बुधवारी (दि. 17)  रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुग्धा आशिष बिजवे (11) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील आठवडी बाजारात राहणारे आशिष बिजवे यांची मुलगी मुग्धा ही बुधवारी रात्री घराच्या वरच्या माळ्यावर अभ्यासासाठी गेली होती. तिथे पाळण्यावर बसून झोका घेताना अचानक तिच्या गळ्याला पाळण्याची दोरी आवळली गेली. फास लागल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने मुग्धाच्या आजीने वर जाऊन बघितल्यावर ही घटना उघडकीस आली.

त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.  कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. मात्र, तोवर तिचा मृत्यू झाला होता. घटनेदरम्यान मुग्धाची आई आणि लहान बहीण बाहेरगावी गेले होते. तर मुग्धाला आवडणारी भाजी आणण्यासाठी तिचे वडील हॉटेलमध्ये गेले होते. ही घटना कळताच मुग्धाची आई वैशाली बिजवे यांनी तातडीने घर गाठले. गतप्राण झालेली लाडकी मुलगी बघून त्यांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Related Posts