IMPIMP

Amravati News : जुन्या वादातून युवकावर गोळीबार, नंतर केला चाकू हल्ला ! 5 जणांविरोधात FIR

by sikandershaikh
Amravati News | shooting youth old argument gadgenegar police registered case against 5 persons

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Amravati News | 5 जणांनी संगनमत करून त्यातील 3 जणांनी जुन्या वादातून एका युवकावर देशी कट्ट्यानं गोळ्या झाडल्याची आणि एकानं चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलगाव येथील अजीज हॉलसमोर बुधवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जखमी युवकाला आधी इर्वीन रुग्णालय आणि नंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

फिरोज खान (30, रा. हबीबनगर) असं या जखमी युवकाचं नाव आहे. इम्रान अशरफी (पठाण चौक), इम्रान लांबा, कौशिक पडपा, आबीद खॉ, राजा खॉ, तसंच दोन ते तीन अज्ञात इसम अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, फिर्यादी अफरोज खॉ, हाफीज खॉ (29, रा. हबीबनगर) यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
फिर्यादींचा मोठा भाऊ फिरोज खान हा त्याचा मित्र सुलतान सोबत घटनास्थळी बसला होता.
यावेळी आरोपींपैकी इम्रान अशरफी याच्या इशाऱ्यावरून यातील 3 आरोपींनी युवकावर गोळीबार केला.
त्यातील एक गोळी त्याच्या छातीत लागली आणि तो जाग्यावरच कोसळला. राजा खॉ नावाच्या आरोपीनं त्याच्या छातीवर जीवघेणा चाकू हल्ला केला.

त्यानंतर आरोपी पळून गेले. मित्राच्या आणि नागरिकांच्या मदतीनं फिरोज खानला जखमी अवस्थेत तेथील इर्वीन हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं.
परंतु त्याची प्रकृती नाजूक होती, त्यामुळं त्याला नागपूरला हलवलं गेलं.
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पथकासह घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना केलं.
आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307, 143, 147, 148, 504, 4/25, 3, 25, 5(27) नुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

Redmi Note 10 मध्ये आहे तरी काय ? जाणून घ्या फिचर्स

Related Posts