IMPIMP

जालना : घरफोड्या करणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्याच्या इंदोरमधून मुसक्या आवळल्या

by sikandershaikh
Pune Crime | 2.5 crore fraud in the name of land in Hinjewadi, Pune; Uttung Patil arrested

जालना (Jalana News) :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Jalana News | राज्यात विविध ठिकाणी घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला जालना गुन्हे शाखेने इंदोर येथून शनिवारी (दि. 13) अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.

पवन उर्फ भुरा रामदास आर्या (रा.इंदोर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील एका घरफोडी प्रकरणात आरोपींचा शोध जालना पोलीस घेत होते. त्यावेळी या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील इंदोर येथील आरोपींचा हात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भुजंग यांना मिळाली होती. त्याआधारे भुजंग, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम संबंधित आरोपींचा शोध घेत होती. तपासात पवन उर्फ भुरा रामदास आर्या याचे नाव समोर आले.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर येथे धाव घेऊन आरोपी आर्या याच्या मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडून कारसह जवळपास 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह जालना जिल्ह्यात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली.
तसेच जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, बीड, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

Baramati News : बारामती शहरात पुन्हा वाढतोय ‘कोरोना’ !