IMPIMP

Aurangabad Crime | धक्कादायक ! लग्न ठरवून ‘लिव्ह इन’मध्ये मारली ‘मज्जा’; हुंड्यासाठी दुसरीसोबत विवाह, पुढं भलतच घडलं

by bali123
Aurangabad Crime | arranging marriage with one girl but marriage for a dowry with another girl

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन   Aurangabad Crime | औरंगाबाद येथील एक धक्कादायक प्रकार समोर (Aurangabad Crime) आला आहे. नोकरी नसल्यामुळे सध्या लग्न करु शकत नाही. तुझ्या आई-वडिलांनी 20 लाख रुपये हुंडा द्यायला हवा, अशी मागणी करत लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live in relationship) राहून मौजमजा केली. त्यानंतर त्या नातेवाईक युवकाने गुपचूप दुसऱ्या मुलीसोबत विवाह (Marriage) केला. गोविंद जनार्दन घोडे (Govind Janardhan Ghode) (रा. खवणे पिंप्री, ता. सेलू, जि. परभणी) असं या युवकाचं नाव आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या उच्चशिक्षीत 25 वर्षीय युवतीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबधित युवकाविरोधात फसवणुकीची फिर्याद (Complaint) दिली आहे.

याबाबत माहिती अशी, फिर्यादी तरूणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत होती. त्या तरुणीची नातेवाईक असलेल्या गोविंद घोडेसोबत 2016 साली ओळख झाली. नातेवाईक असल्यामुळे तरुणीच्या आई, वडिल आणि मामाने त्याला तरुणीसोबत विवाह करण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी गोविंदने दोघांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे म्हटले. त्यानंतर 2017 साली तरुणीने विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यामुळे ती विद्यापीठातील वसतीगृहात राहू लागली. दोघेही त्यावेळी भेटु लागले. (Aurangabad Crime)

कोरोनामुळे (2020) मध्ये वसतीगृह बंद झाल्याने तरुणी ,आई आणि गोविंद घोडे (Govind Ghode) असे तिघेही बेगमपुरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहू लागले होते. तसेच, नोकरी नसल्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी 20 लाख रुपये हुंडा द्यावा, अशी मागणी गोविंदने केली. मात्र, त्यानंतर त्याचं लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समजली. विवाहाची तारीख 28 मे 2021 ही ठरली असतानाही गोविंदने बीड येथील एका तरुणीशी गुपचूप लग्न केले. याबाबत माहिती समजल्यानंतर संबधित तरुणीसह तिच्या कुटुंबियांना धक्का बसला.

दरम्यान, तरुणीसह तिच्या कुटुंबियांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (CP Dr. Nikhil Gupta)
यांच्याकडे तक्रार केली आहे. यानूसार बेगमपुरा पोलिसात (Begumpura Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार (Police Inspector Prashant Potdar) यांनी दिली.

Web Title :- Aurangabad Crime | arranging marriage with one girl but marriage for a dowry with another girl

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts