IMPIMP

Aurangabad Crime | अखेर प्रा.डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; कसं मारायचं याचा शोध घेतला Google वर!

by nagesh
Aurangabad Crime | aurangabad professor dr rajan shinde murder case revealed juvenile accused detained

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन  प्राध्यापक डॉ. राजन शिंदे (Dr. Rajan Shinde) यांच्या हत्या प्रकरणाचं (Aurangabad Crime) गूढ अखेर
उकललं आहे. आज सकाळी डॉ. शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीतून खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना सापडले. यात व्यायामाचा
एक डंबेल्स, स्वयंपाक घरातील चाकू, टॉवेल याचा समावेश आहे. खून झाल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर पोलिसांना डॉ. राजन शिंदे यांच्या खूनचा
उलगडा (Aurangabad Crime) करण्यात यश आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (juvenile accus arrest) घेतले आहे. विशेष
म्हणजे 9 महिन्यापासून मारेकरी शिंदे यांची हत्या करण्याचा प्लॅन करत होता. कोणत्या ठिकाणी मारल्याने माणुस मरु शकतो याचा गुगलवर शोध
(google search) घेतला.

हायप्रोफाईल वस्तीतील प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या डोक्यात वार करुन नंतर गळा, हाताच्या नसा कापून 11 ऑक्टोबर रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा (Aurangabad crime) तपास पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (CP Dr. Nikhil Gupta) यांनी स्वत: कडे घेतला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विविध पथके नेमण्यात आली होती. या पथकांकडून सर्व तांत्रिक पुरावे हस्तगत (Aurangabad Professor murder case) करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, एका संशयिताने दिलेल्या माहितीवरून घराच्या जवळील विहिरीत खुनासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेतला. विहिरीतील पाणी आणि गाळ काढल्यानंतर तीन दिवसांनी आज सकाळी खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे सापडली. यामध्ये व्यायामासाठी वापरायचे अंदाजे 5 किलोचे डंबेल्स (5 kg dumbbells), एक धारदार चाकू (Knife) आणि रक्त पुसलेले टॉवेल याचा समावेश आहे. सर्व शस्त्र सापडताच पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपीने डॉ. राजन यांच्या डोक्यात डंबेल्स मारले त्यानंतर चाकूने गळा व हाताच्या नसा कापल्या या निष्कर्षापर्यंत पोलीस आले (Aurangabad Crime) आहेत.

तो हिटलर होता म्हणून संपवला

घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी रात्री 11 च्या सुमारास एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यावेळी पहिल्यांदाच त्याने खुनाची कबुली दिली. यावरून मुख्य संशयिताची चौकशी करण्यात आली.
त्यानेही खून केल्याचे कबूल करुन त्यासाठी वापरलेली शस्त्र सिडको एन 2 येथील महापालिकेच्या जागेत असलेल्या विहिरीत टाकल्याची (Aurangabad Professor murder case) माहिती पोलिसांना दिली.
तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा असे संशयिताने सांगितल्याची माहिती समजतेय.

Web Title: Aurangabad Crime | aurangabad professor dr rajan shinde murder case revealed juvenile accused detained

हे देखील वाचा :

Mumbai University | मुंबईतील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Multibagger Stock | गुंतवणुकदारांमध्ये सुपरहिट आहे ‘ही’ म्युझिक कंपनी, एक वर्षात 700 टक्केपेक्षा जास्त दिला ‘रिटर्न’; जाणून घ्या

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमीच; जाणून घ्या आजचे दर

Related Posts