IMPIMP

Aurangabad News | धक्कादायक ! पाण्याचा अंदाज न आल्याने शेततळ्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू

by nagesh
aurangabad news two youths drown in aurangabad one week 8 people drowned

औरंगाबाद न्यूज (Aurangabad News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : Aurangabad News | औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मुत्यू (Death) झाल्याची दुर्देवी घटना समोर (Aurangabad News) आली आहे. मोहंमद अरसलाम नियाजी (Mohammad Arsalam Niazi) आणि शेख साजिद शेख याकूब (Sheikh Sajid Sheikh Yakub) असे या दोन मृत तरुणांची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी की, मोहंमद अरसलाम नियाजी आणि शेख साजिद शेख याकूब हे दोघे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेततळ्यात पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. शेततळ्यातील त्या दोन तरुणांना (Two young men) पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले.

या दरम्यान, सर्वत्र पावसाने धुमाकूळ केला आहे. यामुळे सर्व नाले,तलाव, नद्या, विहिरी तुडूंब भरून वाहत
आहेत. अशातच युवक पोहण्याची वाट धरत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची वाढती
पातळी आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्दैवी घटना वाढताना दिसत आहे. तर,
धक्कादायक बाब म्हणजे मागील एका आठवड्यामध्ये जवळपास आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Web Title : aurangabad news two youths drown in aurangabad one week 8 people drowned

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | जळगावमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; प्रचंड खळबळ

Police Crime News | पोलिस दलातील महिलेचे विवस्त्र फोटो व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

Pune Rain | पुणे महापालिकेकडून नदीकाठच्या ‘या’ परिसरांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या यादी

Related Posts