IMPIMP

औरंगाबादमध्ये खळबळ ! ‘कोरोना’ सेंटरमध्ये डॉक्टरचा पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

by sikandershaikh
Mumbai Crime | eight abortions judges daughter descent crime against laws husband incidents highbrow

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) मंगळवारी मध्यरात्री महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात आयुष डॉक्टरने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा (rape) प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले. या घटनेनंतर डॉक्टरांनी कानावर हात ठेवले. रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली.

दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दाखल झाली. मंगळवारी रात्री २ वाजता डॉक्टरने या महिलेवर बलात्काराचा (rape) प्रयत्न केला. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करीत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. पीडित महिला रुग्णालयात रडत होती. दरम्यान, या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता.

दरम्यान, घटनेची माहिती त्वरित नातेवाईकांना मिळाली.
नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली.
रुग्णालयाच्या डॉ. उज्वला भामरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी या प्रकारावर बोलण्याचे टाळले.
तसेच महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या ओल्या पाट्‌र्या सुरू झाल्याची तक्रार समोर येत आहे.
सुरक्षा रक्षकांना येथील डॉक्टरांनी अनेकदा शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे.
बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला.
त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.
विशेष बाब म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

‘उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झालेत, जनता या राहुल गांधीगिरीचा समाचार घेईलच’

Related Posts