Anjali Damania On Dhananjay Munde | परळीत फेरनिवडणूक घ्या! मतदान केंद्रावर दहशत माजवणार्या मुंडे समर्थक फड पिता-पुत्रावर गुन्हा दाखल होताच दमानिया आक्रमक

बीड : Anjali Damania On Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बुथ ताब्यात घेण्याचे प्रकार घडल्याचा गंभीर आरोप होत आहे. याचे काही व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. यासंबंधीचे जवळपास सर्व व्हिडिओ पोलीस दलासह निवडणूक आयोगाकडे सुद्धा देण्यात आले होते. आता तब्बल 82 दिवसानंतर मुंडे यांचे समर्थक आणि मतदान केंद्रावर दहशत माजवणारा कैलास फड आणि त्याच्या मुलासह पाचजणांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीत फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत फेरनिवडणुकीची मागणी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी शहरातील मतदान केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मोठी दहशत निर्माण केली होती. येथील शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले होते.
कोण पोलिस?, कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मध्ये कोणीही जायचे नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढले होते, तसेच नेते माधव जाधव यांनाही मारहाण केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर याची दखल घेत या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
परळी पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये म्हटले आहे की, अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल, विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाले हे आता स्पष्ट झाले आहे.
इलेक्शन कमिशनकडे असे 20 ते 25 तक्रारीचे व्हिडियो आहेत. त्यातील प्रत्येक व्हिडियो वर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल एसपी नवनीत कावत यांचे आभार, असे दमानिया यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.