IMPIMP

Ahmednagar Crime | धक्कादायक ! पती-पत्नीची 10 वर्षीय मैथिलीसह गळफास घेऊन आत्महत्या, तिघांच्या ‘सुसाईड’मुळं अहमदनगरमध्ये प्रचंड खळबळ

by nagesh
Ahmednagar Crime | Shocking ! Ahmednagar family of 3 dies by suicide due to financial stress

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | जिल्हयातील केडगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. सुरूवातीलाला मुलीला गळफास देवुन त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहचले असून त्यांना सुसाईड नोट मिळाल्याची माहिती (Ahmednagar Crime) सुत्रांनी दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संदीप दिनकर फाटक (46), किरण संदीप फाटक (33) आणि मैथिली संदीप फाटक (10) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. तिघेही त्यांच्या घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेजारी राहणार्‍यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना कळविली. कोतवाली पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

संदीप फाटक यांची केडगाव ही सासूरवाडी आहे.
अलिकडील काळात केडगावदेवी भागातील ठुबे मळयात ते रहावयास गेले होते.
कोंडीराम वीरकर हे त्यांचे सासरे आहेत.
रात्रीच्या सुमारास फाटक कुटुंबियांचे त्यांच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून बोलणे देखील झाले होते.
आज सकाळी बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजार्‍यांनी आणि सासुरवाडीच्या लोकांनी फाटक यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांना तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
गेल्या अनेक दिवसांपासुन फाटक हे आर्थिक अडचणीत होते आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकंदरीत या घटनेमुळं संपुर्ण अहमदनगर जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title : Ahmednagar Crime | Shocking ! Ahmednagar family of 3 dies by suicide due to financial stress

हे देखील वाचा :

Pune Crime | माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची घरे फोडून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसह 53 लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याने सराईत गुन्हेगारासह चौघांकडून तरुणावर कोयत्याने वार

UPI Payment | इंटरनेटशिवाय करता येते पेमेंट, जाणून घ्या UPI पेमेंटची पूर्ण प्रक्रिया

Related Posts