Akola Crime News | मंगळसूत्र चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याच्या जीवावर बेतलं, डोक्यावर-चेहऱ्यावर वार करत संपवलं

अकोला : Akola Crime News | पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणं नवऱ्याच्या जीवावर बेतलं आहे. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्याने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. हेमंत गावंडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली.
अधिक माहितीनुसार, अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लेटफार्म चारवर रेल्वेतून गावंडे दाम्पत्य खाली उतरले. याचवेळी एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र तोडून पडणाऱ्या चोरट्याचा महिलेचा पती हेमंत गावंडे याने पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटर पर्यंत पाठलाग केल्यानंतर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला. मात्र, या चोरट्याने हातात येईल, त्या वस्तूने हेमंत यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली.
घटनास्थळावर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. जखमी झालेल्या हेमंत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास करत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. परमार असे त्याचे नाव असून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे.
Comments are closed.