IMPIMP

Amravati Crime | फाइलमागे 5 हजार रुपयांची मागणी; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ

by nagesh
Amravati Crime | Demand for Rs 5,000 on file; Excitement erupted by the audio clip after the officer's death

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन Amravati Crime | पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने प्रत्येक फाइलमागे 5 हजार रुपयांची मागणी केली. या तणावामुळे एका अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू (Accidental death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर एक ऑडिओ क्लिप (Audio clip) उघडकीस आली आहे. यामधून सर्व बाब स्पष्ट झाली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील (Amravati Crime) तिवसा येथे घडली आहे. गटविकास अधिकाऱ्याने त्यांना कार्यमुक्त केल्याने ते तणावात होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याबाबत माहिती अशी की, वरुड तालुक्यातील प्रमोद निंबोरकर (Pramod Nimborkar) तिवसा पंचायत समितीकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना कार्यमुक्त करावे, असा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव (Dr. Chetan Jadhav) यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके Deputy Collector Ram Lanka यांच्याकडे पाठविला होता. उपजिल्हाधिकारी लंके यांनी कुठलीही शहानिशा न करता निंबोरकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता कार्यमुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे त्यांची नोकरी गेली. त्यानंतर अचानक मोर्शी-वरूड रोडवर अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू (Died) झाला आहे.

दरम्यान, त्याआगोदर गटविकास अधिकारी डॉ. जाधव सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईलमागे 5 हजार रुपये गोळा करण्यास सांगत आहेत,
असे निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी लंके यांना फोन करून सांगत असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे.
निंबोरकर यांचा मृत्यू हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास सुरू आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Amravati Crime | Demand for Rs 5,000 on file; Excitement erupted by the audio clip after the officer’s death

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी…’

Jan Dhan Accounts | खुशखबर ! SBI च्या ‘या’ ग्राहकांना मोफत मिळताहेत 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Gold Price Today | धनत्रयोदशी 2021 पूर्वी सोने झाले 1100 रुपये महाग, चांदीत 4900 रुपयांची तेजी

Related Posts